Voter ID: आता १५ दिवसांत घरबसल्या मिळणार वोटर आयडी, अशा पद्धतीने करा ट्रॅक

Voter ID 15 Days Home Delivery: आता वोटर आयडीची फक्त १५ दिवसांत होम डिलिव्हरी होणार आहे. यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.
Voter ID
Voter IDSaam Tv
Published On

वोटर आयडी हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक १८ वर्षांवरील भारतीय नागरिकाकडे मतदान कार्ड असते. मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. त्यामुळे हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वोटर आयडी काढायचे असेल तर घसबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यानंतर तुम्हाला १५ दिवसात तुमचे वोटर आयडी घरी डिलिव्हर होणार आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही मोठी घोषमा केली आहे.

Voter ID
Voter ID: फक्त १५ दिवसात मिळेल मतदान कार्ड; SMS वरून मिळेल अर्जाच्या स्थितीची माहिती

आता मतदाराचे नाव मतदान यादीत अपडेट होताच १५ दिवसांत तुम्हाला घरपोच वोटर आयडी मिळणार आहे. वोटर आयडीचे सुलभ वितरण करणे आणि रिअल टाइममध्ये ट्रॅकिंग सोपे करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission On India) याबाबत निवदेन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, नवीन प्रणामी निवडणूक नोंदणी अधिकारी द्वारे EPIC तयार करण्यापासून ते पोस्ट ऑफिसद्वारे मतदारांपर्यंत पोहचवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवता येणार आहे. मतदारांना आता पोस्ट ऑफिस कधीपर्यंत वोटर आयडी डिलिव्हरी करणार याबाबत एसएमएसद्वारे माहिती मिळेल.

अलीकडेच निवडणूक आयोगाने ECINet लाँच केला आहे.या प्लॅटफॉर्मवर एक आयटी मॉड्यूल सादर करण्यात आले आहे. यामध्ये नवीन आयटी प्लटॅफॉर्म सध्या असलेल्या प्रणालीमध्ये अपग्रेड करेल.

Voter ID
Aadhaar-PAN Cancel: मृत व्यक्तीचे पॅन-आधार कार्ड रद्द कसं करायचं? आजच करा हे काम, अन्यथा होईल मोठं नुकसान

वोटर आयडी ट्रॅक कसा करावा? (How To Track Voter ID)

तुम्ही वोटर आयडी काढल्यानंतर NVPS वर जा.

यानंतर अकाउंट लग इन करा.

यानंतर उजव्या बाजूला Track Application Status वर क्लिक करा.

यानंतर रेफरंस नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला फॉर्म 6 आणि 6A मिळेल.

यानंतर राज्य सिलेक्ट करुन सबमिट बटणवर क्लिक करा.यानंतर तुम्हाल तुमच्या वोटर आयडीचा स्टेट्‍स समजेल.

Voter ID
Aadhaar Update App: आता काही मिनिटांत होणार आधार अपडेट; UIDAI लाँच करणार QR कोड बेस्ड अ‍ॅप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com