Voter ID: फक्त १५ दिवसात मिळेल मतदान कार्ड; SMS वरून मिळेल अर्जाच्या स्थितीची माहिती

Voter ID : मतदार यादीतील तपशील अपडेट केल्यानंतर १५ दिवसांच्या आत मतदारांना मतदार ओळखपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
Voter ID
Election Commission On Voter IDsaam tv
Published On

मतदारांनी त्यांच्या मतदान कार्डात काही बदल केले किंवा त्यात काही माहिती अपडेट केली तर ते मतदान कार्ड लवकर देण्यात यावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. अवघ्या १५ दिवसातच मतदारांना मतदान कार्ड देण्ंयात यावीत, असं निर्देश देण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत मतदारांना मतदाराचे ओळखपत्रे पोहोचवण्यासाठी एका महिन्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतोय.

Voter ID
Iran vs Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे उडणार महागाईचा भडका; खते, घरातला किराणा महागणार

त्यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान ओळख पत्र लवकर देण्याबाबत सूचना केल्या आहेत. मतदान ओळखपत्र १५ दिवसात मतदारांना मिळाले पाहिजे असे सांगताना त्या ओळख पत्रांची स्थिती काय आहे, याचीही माहिती नागरिकांना मिळेल असं निवडणूक आयोगानं सांगितलंय.

निवडणूक मंडळाने म्हटले आहे की, नवीन प्रणाली निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) द्वारे EPIC तयार करण्यापासून ते पोस्ट विभाग (DOP) द्वारे मतदारांना कार्ड पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे रिअल-टाइम ट्रॅकिंग सुद्धा केलं जाणार आहे. मतदारांना प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे सूचना देखील मिळतील, ज्याद्वारे त्यांना त्यांच्या EPIC च्या स्थितीबद्दल माहिती मिळत राहील, असंही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Voter ID
KYC केलं तरच मिळेल कार्ड; नवीन सिम कॉर्डचा नवा नियम वाचला का?

मतदार ओळखपत्र हे भारतात वैयक्तिक ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाणारे एक कार्ड आहे. हे कार्ड सरकारी संस्थेद्वारे जारी केले जाते. मतदार ओळखपत्रात खालील तपशील असतात:

एक युनिक सिरीयल नंबर (EPIC नंबर)

कार्डधारकाचा फोटो

संबंधित राज्य/राष्ट्रीय चिन्ह असलेला होलोग्राम

कार्डधारकाचे नाव

कार्डधारकाच्या वडिलांचे नाव

कार्डधारकाचे लिंग

कार्डधारकाची जन्मतारीख

मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा?

भारतातील नागरिक मतदार ओळखपत्रासाठी तीन प्रकारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा अर्ध-ऑनलाइन पद्धतींद्वारे.

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) ला भेट द्या.

होमपेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असलेल्या 'साइन-अप' पर्यायावर क्लिक करा.

तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि 'सुरू ठेवा' वर क्लिक करा.

तुमचे 'नाव', 'आडनाव', 'पासवर्ड', 'पासवर्डची पुष्टी करा' एंटर करा आणि 'ओटीपीची विनंती करा' या बटणावर क्लिक करा.

तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवलेला ओटीपी एंटर करा आणि 'व्हेरिफाय' वर क्लिक करा.

मतदार सेवा पोर्टलमध्ये ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करून, तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करून आणि ‘रिक्वेस्ट ओटीपी’ बटणावर क्लिक करून लॉग इन करा.

तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा आणि 'Verify & Login' बटणावर क्लिक करा.

'सर्वसाधारण मतदारांसाठी नवीन नोंदणी' टॅब अंतर्गत असलेला 'फॉर्म ६ भरा' बटणावर क्लिक करा.

फॉर्म ६ वर सर्व तपशील प्रविष्ट करा, ज्यामध्ये वैयक्तिक तपशील, नातेवाईकांचे तपशील, संपर्क तपशील, आधार नंबर आणि इतर तपशील, जन्मतारीख, पत्ता आणि घोषणापत्र समाविष्ट आहे.

दिलेल्या विभागांमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि 'पूर्वावलोकन करा आणि सबमिट करा' बटणावर क्लिक करा.

प्रविष्ट केलेले तपशील बरोबर आहेत का ते तपासा आणि 'सबमिट करा' वर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com