मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Election) सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवला. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे यांचे मत बाद केले, या प्रकरणी आता सुहास कांदे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. आमदार कांदे यांनी कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे, आज त्यांनी पुण्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील अनिल अंतुरकर यांची भेट घेतली आहे.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. महाविकास आघाडीचे तीन, भाजपचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे हा विजय म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे यश असल्याचे म्हटले जात आहे. (Rajya Sabha Election 2022)
राज्यसभा निवडणुकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत.
या प्रकरणी काल संजय राऊत यांनीही माहिती दिली आहे. विरोधकांनी अपक्षांना केंद्रीय यंत्रणांची भीती घालून मत आपल्याकडे वळवून घेतल्याचा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, मी पराभूत नाही म्हणणार विजयी होऊ शकला नाही असं मी म्हणेन. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं एक मत बाद केलं, तशाच प्रकारच्या काही मतांवर आम्ही आक्षेप घेतला होता. तशीच चुक समोरच्यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्यांची मतं बाद केली नाही. आमचं मत मात्र बाद केलं. शेवटी या देशातल्या केंद्रीय यंत्रणा या केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या दबावाखाली कशाप्रकारे काम करतात हे आम्ही काल डोळ्यांनी बघितलं. ईडी, सीबीआय आणि अशा प्रकारच्या संस्था वापरल्या जातात का? अशी शंका येते असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.