
मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांना स्वतः च्या पायावर उभं राहता यावे, यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शिक्षणाचा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच मुलींच्या शिक्षणासाठी अनेक स्कॉलरशिप सुरु करण्यात आल्या आहे. या योजनांमध्ये मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.
1. उडान स्कॉलरशिप ( CBSE UDAAN Scholarship)
सीबीएसई अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. जेणेकरुन त्यांना इंजिनियरिंगच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळेल. मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये अॅडमिशन घेता यावे. यासाठी मदत केली जाते. या स्कॉलरशिपमध्ये राखीव प्रवर्गातील मुलींना जागा राखीव असतात.
2. बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप (Begam Hazrat Mahal National Scholarship)
बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप नववी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. ही स्कॉलरशिप मुस्लिम, ख्रिश्चन, सिख,बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्टद्वारे दिली जाते.
3. प्रगती स्कॉलरशिप (Pragati Scholarship)
प्रगती स्कॉलरशिप अशा मुलींना दिली जाते. त्यांनी AICTE मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये डिग्री किंवा डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतले असेल. यासाठी मुलींच्या कुटु्ंबाचे उत्पन्न ८ लाखांचे कमी असावे.
4. इंदिरा गांधी स्कॉलरशिप (Indira Gandhi Scholarship)
इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल चाइल्ड ही त्या मुलींना दिली जाते ज्या एकुलत्या एक असतील. त्यांनी कोणत्याही नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये अॅडमिशन घेतले असेल.
5. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (Savitribai Phule Scholarship)
ही योजना खास महाराष्ट्रातील मुलींसाठी राबवण्यात आली आहे.मागासवर्गीय मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये आठवी ते १०वीच्या विद्यार्थींनीचा समावेश आहे. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ही स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.