Scheme For Farmer: सरकार शेतकऱ्यांना देतेय ३६००० रूपये, फक्त हे काम करा

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ३६००० रुपये मिळणार आहे.
Scheme For Farmer
Government Scheme For FarmerSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, याच उद्देशाने वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान मानधन योजना राबवली आहे.

पीएम किसान मानधन योजनेत (PM Kisan Mandhan Yojana) शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. या योजनेत ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शेतकऱ्यांना उतारवयात कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Scheme For Farmer
Post Office Scheme: पोस्टात २ लाख रुपये गुंतवा अन् ६ लाख मिळवा, कसं काय? घ्या जाणून

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची पात्रता

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी जोडले जाऊ शकतात. त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी. याचसोबत ते करदाते नसावे. त्यांनी इतर सरकारी योजना म्हणजे पेन्शन, ईपीएफ, एनपीएस आणि ईएसआयसी या योजनेचा लाभ घेतला नसावा. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आहे.

या योजनेतील योगदान हे शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून असते. या योजनेत जर ४० व्या वर्षी कोणी गुंतवणूक करत असेल तर दर महिन्याला त्याला २०० रुपये द्यायचे आहेत. तेव्हा त्याला वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Scheme For Farmer
Government Scheme: व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी सर्वात आधी www.pmkmy.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Apply Now वर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरावी. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

Scheme For Farmer
Birth Rate Scheme: तिसऱ्या बाळाला जन्म, 50 हजार मिळणार? जन्मदर वाढीचं नवं मॉडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com