Toordal Price Increase: डाळींच्या किंमती कडाडल्या! तूरडाळ, मूगडाळींच्या किंमतीत वाढ

Toordal And Mungdal Price Increase : सध्या महागाई खूप जास्त वाढली आहे. अशातच आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. गेल्या काही दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Daal Price Hike
Daal Price HikeSaam Tv

सध्या महागाई खूप जास्त वाढली आहे. अशातच आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. गेल्या काही दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना डाळ खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तूरडाळ जवळपास १५ रुपये तर मूगडाळ १० रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या काही दिवसात बाजारात तुरडाळ आणि मूगडाळीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच डाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

तुरडाळीचे नवीन पीक नोव्हेंबर महिन्यात येते. यंदा हे पीक सात टक्के जास्त आले आहे. मात्र, बाजारातील वाढत्या मागणीमुळे तुरडाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहे. राज्यातील सर्वाधिक डाळीचे उत्पादन हे अकोला, मराठवाडा आणि यवतमाळ येथे घेतले जाते. (Latest News)

डाळींचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालकांना त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना लवकरच साठा मर्यादा लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Daal Price Hike
Blood Sugar Level : रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी? जाणून घ्या

मुंबईत मार्च महिन्यात तूरडाळीचा घाऊक दर हा १२० ते १४० रुपये होता. हा दर आता वाढवला असून १४० ते १७० रुपये झाला आहे. किरकोळ दर १४० रुपयांवरुन १७० ते १९० झाला आहे. तर मूगडाळीचे घाऊक दर ९० ते १०० रुपयांवरुन ११० ते १२० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

Daal Price Hike
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! जाणून घ्या त्यांचे अनमोल विचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com