
सोन्याच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. अनेक दिवस सोन्याच्या भावात सतत वाढ झाल्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात ३८० रुपये प्रति तोळ्यांनी घट झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदार सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर कमी झाल्याने तुमच्याकडे सोने खरेदीची चांगली संधी आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)
१ तोळा सोन्याचे दर ९७,५३० रुपये आहे. सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी घट झाली आहे. ८ तोळा सोन्याचे दर ७८,०२४ रुपये आहे. ३०४ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करु शकतात. खूप दिवसानंतर सोन्याचे दर कमी झाले आहेत.
आज २२कॅरेट सोन्याचे दर ३५० रुपयांनी घसरले आहेत. १० ग्रॅम सोन्याचे दर ८९,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१,५२० रुपये आहे. या दरात २८० रुपयांनी कपात झाली आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात २९० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,१५० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,५२० रुपये आहेत. जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही आज खरेदी केल्यावर तुम्हाला फायदा होणार आहे.
चांदीचे दर (Silver Rate)
आज चांदीच्या दरातदेखील कपात झाली आहे. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८०० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १००० रुपये झाली आहे. चांदीच्या दरात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.