सोन्याचे दर कमी होईना, १० तोळे १३,६०० रुपयांनी वाढले; २२ आणि २४ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार?

Gold Becomes Costlier Again: गेल्या काही दिवसांपासून सोनं - चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होतेय. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Becomes Costlier Again
Gold Becomes Costlier AgainSaam
Published On
Summary
  • सोन्याच्या भावात तेजी

  • चांदीच्या दरातही वाढ

  • २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या भावात १३,६०० रूपयांची वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोनं - चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे निश्चितच ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. लग्न म्हटलं सोने - चांदीचे दागिने खरेदी करणं आलंच. दिवाळीत सोन्याचा भाव कमी झाला होता. मात्र, नंतर सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. सध्या सोन्याच्या भावाचा आलेख हा चढताच आहे. दरम्यान, आताही हळूहळू सोन्याचा भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

आज २९ नोव्हेंबर २०२५. आज सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,३६० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२९,८२० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १३,६०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,९८,२०० रूपये मोजावे लागतील.

Gold Becomes Costlier Again
लग्नसराईत सोन्यानं भाव खाल्ला, सोन्यासह चांदीही महागली, १ तोळा सोन्याचा दर किती?

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झालीये. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,००० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १२,५०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,९०,००० रूपये मोजावे लागतील.

Gold Becomes Costlier Again
ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट प्रवास सुसाट, ३ उड्डाणपूल तयार होणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,०३० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,३७० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १०,३०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७३,७०० रूपये मोजावे लागतील.

Gold Becomes Costlier Again
जाग आली अन् बाजुला २ पुरूष, स्ट्रगलिंग मॉडेलनं कॉलेज तरूणीला फसवलं, अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी अन्..

सोन्यासह चांदीच्या दरातही कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात ९ रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १८५ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीमागे ९,००० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,८५,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com