UPI Transactions: UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? १ काम करा, मिनिटात खात्यात पैसे होतील जमा

Tips and Tricks to Get Back UPI Money: भारतातील जवळपास सर्व बँका युपीआय सुविधा देतात. पण अनेकदा चुकून वेगळ्याच खात्यात पैसे सेंड होतात. जर आपल्यासोबतही असं घडत असेल, तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही.
UPI Transaction
UPI TransactionSaam Tv News
Published On

जर चुकून तुमच्याकडून चुकीच्या युपीआयद्वारे दुसऱ्या खात्यात पैसे जमा झाले तर? ते पैसे पुन्हा आपल्या खात्यात आलेच नाही तर? अशावेळी घाबरण्याची काहीही गरज नाही. टेन्शन घेऊ नका. काही ट्रिक्सच्या मदतीने आपल्या खात्यात पैसे जमा होतील. अज्ञात व्यक्तीकडे चुकून गेलेली रक्कम ४८ ते ७२ तासांच्या आत परत मिळवू शकता. या काही ट्रिक्समुळे आपल्याला कुठेही धाव घेण्याची गरज नाही. काही तासात पैसे खात्यात जमा होतील.

मोबाईल फोन आणि इंटरनेटमुळे आजकालचं जीवन सुखकर झालं आहे. प्रत्येक गोष्ट एका क्लिकमध्ये पुर्ण होतात. पैशांचं ट्रॅन्जेक्शन देखील ऑनलाइनद्वारे झटक्यात पुर्ण होतात. बरेच लोक लहान-सहान पेमेंट करण्यासाठी युपीआयचा वापर करतात. युपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. भारतातील जवळपास सर्व बँका युपीआय सुविधा देतात. पण अनेकदा चुकून वेगळ्याच खात्यात पैसे सेंड होतात. जर आपल्यासोबतही असं घडत असेल, तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. काही ट्रिक्सच्या मदतीमुळे आपलं काम सोपं होईल, आणि खात्यात पैसे जमा होतील.

UPI Transaction
Google Pay : Google Play ने भारतात लाँच केले UPI Autopay, पैसे पाठवणे झाले सोपे !

पैसे ट्रान्सफर झालेल्या खातेदाराशी बोला

जर युपीआयद्वारे चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाले असतील तर, त्या नंबरवर कॉल करून पैसे परत करण्याची मागणी करा. तुम्ही त्यांना स्क्रिनशॉट देखील दाखवू शकता. या पद्धतीद्वारे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पण आशा कमी असली तरी, तुम्ही प्रयत्न करू शकता. कारण काही लोक चुकून आलेले पैसे परत देतात. तर काही देणं टाळतात.

युपीआय आणि बँक कस्टमर केअरशी बोला

जर तुम्ही चुकीच्या नंबरवर पैसे पाठवले असतील तर, लगेच युपीआय केअरशी संपर्क साधा. कस्टमर केअरशी संवाद साधून त्यांना संपुर्ण प्रकरण सांगा. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमची तक्रार मांडू शकता.

UPI Transaction
Paytm: पेटीएम कंपनीसाठी खुशखबर! आता जोडू शकणार नवीन UPI यूजर्स

एनसीपीआय पोर्टलवर तक्रार करा

जर तुम्हाला ग्राहक सेवेकडून मदत मिळाली नाही तर, तुम्ही एनसीपीआय पोर्टलवर तक्रार करू शकता. यासाठी सर्वात आधी एनसीपीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर 'गेट इन कॉन्टेक्ट'वर क्लिक करा. यानंतर सर्व माहिती भरा. सबमिट करा. नंतर Dispute Redressal Mechanism निवडा. तक्रार विभागाखाली व्यवहाराचे डिटेल्स एंटर करा. ज्यामध्ये युपीआय ट्रान्झॅक्शनची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर एंटर करा. जेथे कारण विचारले तेथे 'चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केलेले निवडा' यानंतर सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com