

भारत सरकारने “भारत 6G व्हिजन” मिशनची घोषणा केलीय.
भारत हा 6G सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असेन.
6G मुळे डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडेन.
सरकारने आता 6G ची तयारी सुरू केली आहे. एका अहवालात भारताच्या 6G व्हिजनची माहिती देण्यात आलीय. 6G मुळे 5G पेक्षा 1000 पट वेगाने इंटरनेट डेटा अॅक्सेस शक्य होईल. सरकारने 6G बाबत आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. 6G सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारत असणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.
5G च्या अंमलबजावणीनंतर आता 6G वर काम सुरू आहे. यासाठी सरकारने "भारत 6G व्हिजन" मिशन सुरू केलंय. या मिशनचा उद्देश भारतात 6G वर काम करणाऱ्या सर्व भागधारकांना एकत्र आणणे आणि त्याची क्षमता एक्सप्लोर करणं आहे.
6G हे 5G पेक्षा 1000 पट वेगवान असणार आहे. 5G मध्ये 1 जीबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरता येते. तर 6Gजीमध्ये तुम्ही 1000 Gbpsच्या सुपरफास्ट वेगाने इंटरनेट वापरण्यास सक्षम असाल. म्हणजेच काय सर्वात मोठ्या प्रमाणात डेटा देखील क्षणार्धात हस्तांतरित केला जाऊ शकतो. भारतात पुढील पिढीतील कम्युनिकेशन तंत्रज्ञान म्हणजेच 6G ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत.
रविवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 5G च्या जलद अंमलबजावणी आणि अवलंबनानंतर, सरकारचे संपूर्ण लक्ष भारताच्या 6G व्हिजनवर आहे. यात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याने हे खास असणार आहे. या दृष्टिकोनाचे मुख्य ध्येय 2030 पर्यंत भारतात 6G तंत्रज्ञान विकसित करणे आहे.
भारताचे 6G व्हिजन हे परवडणारे, शाश्वत आणि सार्वत्रिक प्रवेश या तत्त्वांवर आधारित आहे. हे व्हिजन प्रत्येक नागरिकाला हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून देणारं असेल. यासह भारतातील स्वदेशी संशोधन, इनोवेशन आणि जागतिक भागीदारीला मदत मिळेल. केंद्र सरकार 2047 च्या विकसित भारत मोहिमेवर काम करत आहे, ज्यामध्ये 5G आणि 6G महत्त्वाची भूमिका बजावतील. अहवालानुसार, 6G च्या आगमनानंतर, रिमोट सर्जरी, प्रगत रोबोटिक्स, स्मार्ट शहरे आणि इमर्सिव्ह व्हिज्युअल अशा अनुभवामध्ये सुधारणा होईल. भारताच्या 6G रोडमॅपचे उद्दिष्ट 2035 पर्यंत राष्ट्रीय GDP मध्ये या क्षेत्राचा वाटा वाढवणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.