

टॅक्स फ्री गुंतवणुकीचे महत्त्व वाढत आहे
पीपीएफ, सुकन्या, ईपीएफ या प्रमुख योजना
सुरक्षित आणि स्थिर परतावा
आजच्या काळात बचत महत्त्वाची आणि निर्णायक आहे. गुंतवणूक केल्याने आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य होताच शिवाय पैसे वाचवण्यासाठीही गुंतवणूक ही महत्त्वाची असते. आपण अशा काही सरकारी योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या केवळ मोठा परतावाच देत नाहीत, तर कर वाचवण्यासाठीही खूप मदत करतात.
पीपीएफ, किंवा सार्वजनिक भविष्य निधी, ही एक लोकप्रिय सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना EEE श्रेणी अंतर्गत येते म्हणजेच (Exempt-Exempt-Exempt). ही योजनेत गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम, हे सर्व पूर्णपणे करमुक्त असते. म्हणजेच काय तुम्हाला तुमच्या पीपीएफ योजनेवर एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. सध्या पीपीएफ योजना ७.१ टक्के व्याजदर देते. पीपीएफ खाते १५ वर्षांनी परिपक्व होत असते.
सुकन्या समृद्धी योजना (SSY), जी मुलींसाठी आहे, ती देखील पूर्णपणे करमुक्त आहे. सुकन्या समृद्धी योजना देखील EEE श्रेणी अंतर्गत येत असते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना ८.२ टक्के इतका आकर्षक व्याजदर दिला जातो. इतर कोणतीही योजना मुलींसाठी असे व्याजदर देत नाही. या योजनेअंतर्गत दरवर्षी कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
ही योजना करमुक्त नसली तरी बहुतांश लोक या योजनेचा लाभ घेतात. १ एप्रिल २०२१ पासून जर एखाद्या कर्मचाऱ्याचे EPF मधील वार्षिक योगदान ₹२.५ लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला करापोटी एक रुपयाही भरावा लागणार नाही. जर योगदान ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला व्याजावर कर भरावा लागेल. ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफ खात्यांवर गेल्या वर्षीप्रमाणेच ८.२५ टक्के व्याजदराची शिफारस केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.