Share Market: टाटाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षात लाखभर गुंतवणुकीवर ८० लाखांचा नफा

Trent Limited Share Price: शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेडचे शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ०.४३ टक्क्यांनी वाढून सध्या ती २९६८ रुपयांवर आहे.
Share Market
Share MarketSaam Tv
Published On

Tata Trent Limited Share Value :

शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेडचे शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ०.४३ टक्क्यांनी वाढून सध्या ती २९६८ रुपयांवर आहे. त्यामुळे ट्रेंट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना चांगला परतावा मिळाला आहे. ट्रेंट लिमिटेडने गेल्या १ महिन्यात १२ टक्के तर ६ महिन्यात ७२ टक्के परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना यावर्षी आतापर्यंत १२१ टक्के परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

मागच्या एका वर्षात ट्रेंट लिमिटेडच्या (Trent Limited )गुंतवणूकदारांना १३१ टक्के परतावा मिळाला होता. तर पाच वर्षीपूर्वी कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त ३६१ रुपये होती. तर आता या किंमतीत ७२१ टक्क्यांची वाढ झाली असून शेअर्सची किंमत २९६८ रुपये झाली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी ५ वर्षांआधी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाखांची गुंतवणूक केली आहे, त्यांना जवळपास ८० लाखांचा नफा झाला आहे.

ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स (Share)१ जानेवारी १९९९ रोजी बाजारात ९.५७ रुपयांच्या किंमतीवर लिस्ट झाले होते. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना ३०,००० टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने मागील १० वर्षात कधीही निगेटिव्ह परतावा दिला नाही.

ट्रेंट लिमिटेड कंपनीची मार्केट कॅप सध्या १,००,००० कोटी रुपये आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीमध्ये टाटा सन्सचा (Tata Sons) ३७ टक्के हिस्सा आहे.

Share Market
Electric Vehicle: वाहन क्षेत्रात होणार मोठा बदल, दरवर्षी 1 कोटी इलेक्ट्रिक वाहनांची होणार विक्री होणार: नितीन गडकरी

गुंतवणूकदारांचा मागील १० वर्षातील नफा

वर्ष २०१४ मध्ये १९ टक्के नफा

वर्ष २०१५ मध्ये १८ टक्के नफा

वर्ष २०१६ मध्ये १५ टक्के नफा

वर्ष २०१७ मध्ये ६८ टक्के नफा

वर्ष २०१८ मध्ये ८ टक्के नफा

वर्ष २०१९ मध्ये ४६ टक्के नफा

वर्ष २०२० मध्ये ३१ टक्के नफा

वर्ष २०२१ मध्ये ५५ टक्के नफा

वर्ष २०२२ मध्ये २७ टक्के नफा

वर्ष २०२३ मध्ये १२० टक्के नफा

Share Market
Reliance industries: मुकेश अंबानी यांच्या कंपनीची कमाल; 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ५०००० कोटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com