अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयाचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. अमेरिकन शेअर बाजारातील तेजीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी तेजी पाहायला मिळाली.
गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ९०० अंकांनी भरारी घेतली. निफ्टीनेही मोठी उडी घेतल्याने अवघ्या १० मिनिटातच गुंतवणूकदार मालामाल झाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास सेन्सेक्स ७०,४८५ वर पोहोचला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर निफ्टीमध्येही २५१ अंकांची वाढ झाल्याने २१, १७७ वर पोहचली होती. महत्वाची बाब म्हणजे १० मिनिटातच BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३ लाख कोटी रुपयांनी वाढून ३५४.१९ लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारातील ही वाढ अशीच झालेली नाही.
या वाढीमागील कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात वाढ केलेली नाही. सलग तिसऱ्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत.फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) या निर्णयामुळे जगभरातील बाजारांना दिलासा मिळाला आहे.
फेड चेअरमनने व्याज दर २२ वर्षांच्या उच्चांकावर अपरिवर्तित ठेवले आहेत. त्याचबरोबर पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर ५.२ ते ५.५ या पातळीवर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, शेअर बाजारामध्ये तेजीचा परिणाम शेअर्सच्या किंमतींवरही झाला आहे.
एचसीएल टेक, इन्फोसिस, एमएचपीएसीस आणि कार्गोज या आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी चांगलीच उडी घेतली आहे. याशिवाय बँक, फायनान्स कंपन्यांच्या शेअरमध्येही वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.