Tata Motors Hike Price: कार घेण्याचे स्वप्न राहाणार अपूर्ण? टाटाच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत होणार वाढ

Tata Motors Increased Price Of Vehicles: टाटा मोटर्स येत्या वर्षात आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. रविवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
Tata Motors
Tata MotorsSaam Tv
Published On

Tata Motors Increased Price Of Commercial Vehicle In 2024:

वाहन उत्पादनात टाटा मोटर्स ही कंपनी अग्रेसर आहे. अनेकजण वाहन खरेदी करताना सर्वात आधी टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्स येत्या वर्षात आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवणार आहे. रविवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. १ जानेवारीपासून या किमती वाढवण्यात येणार आहे.

कंपनीने एका निवेदनातून ही माहिती दिली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी व्यायवसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कंपनीने सांगितले. फक्त व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढणार असल्याचेही कंपनीने सांगितले.

याआधी मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा आणि ऑडी या कंपन्यानी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. टाटा एस, टाटा इंट्रा आणि टाटा विंगर यासारख्या अनेक मॉडेल्सचा समावेश यात होणार आहे.

Tata Motors
BSE Sensex Today : सेन्सेक्सचे विक्रमी उड्डाण; इतिहासात पहिल्यांदाच 70, 000 पार, निफ्टीही जोरदार

काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. आम्ही आमच्या प्रवासी आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमती जानेवारीमध्ये वाढवण्याचा विचार करत आहोत. ही दरवाढ नेमकी पुढच्या काही आठवड्यात होईल असे त्यांनी सांगितले होते.

नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा मोटर्सच्या जागतिक वाहन विक्रित १.७३ टक्के घट दिसून आली आहे. २०२२ नोव्हेंबरमध्ये ७५,४७८ युनिट्स विकले गेले होते. त्या तुलनेत ७४,१७२ युनिट्सची नोंद या महिन्यात नोंदवण्यात आली आहे.

Tata Motors
Gold Silver Rate (11th December 2023): खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात आठवड्याभरात २००० रुपयांनी घसरण, आजचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com