Tata Motors EV Sales : ई- वाहनांचा विस्तार, टाटा मोटर्स महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ईव्‍हींची करणार 21 टक्क्यांनी वाढ

Tata EV Sales : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक आहेत.
Tata Motors EV Sales
Tata Motors EV Sales Saam Tv
Published On

Tata Motors : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक आणि भारतातील EV क्रांतीच्‍या क्षेत्रात कंपनीने YTD - CY23 मध्‍ये 76 टक्‍क्‍यांच्‍या मार्केट शेअरसह महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये लक्षणीय वाढ करणे सुरूच ठेवले आहे. या वाढीचे श्रेय EVबाबत वाढती जागरूकता, चार्जिंग्स, पायाभूत सुविधेमध्ये वाढ या बाबींना जाते.

जेथे विविध शहरांमध्‍ये आणि प्रमुख महामार्गांवर धोरणात्‍मकरित्‍या जवळपास 1956 स्‍थापित करण्‍यात आले. तसेच राज्‍यामध्‍ये 121 सेल्‍स (Sales) आऊटलेट्स आणि 42 टाटा ऑथोराइज्‍ड सर्विस सेटअप्‍सचे प्रबळ वाढते नेटवर्क आणि विद्यमान ग्राहकांकडून सकारात्‍मक प्रतिसादाने जलद अवलंबतेला सक्षम केले आहे.

Tata Motors EV Sales
New Hyundai i20 Facelift : Hundayi ची Tata सोबत स्पर्धा ! लवकरच लॉन्च करणार फेसलिफ्टेड मॉडेल...

टाटा मोटर्सच्‍या ईव्‍ही पोर्टफोलिओमधील नवीन (New) वेईकल टियागो.ईव्‍हीने ईव्‍हींचे लोकशाहीकरण केले आणि भारतातील नवीन शहरांमध्‍ये लाँच करण्‍यात आली. ही वेईकल सर्वात जलद बुक करण्‍यात आलेली ईव्‍ही बनली, फक्‍त दोन दिवसांमध्‍ये 20 हजाराहून अधिक बुकिंग्‍जची नोंद झाली आणि चार महिन्‍यांपेक्षा कमी वेळेमध्‍ये 10 हजार युनिट्स वितरित करणारी फास्‍टेस्‍ट ईव्‍ही ठरली.

टाटा मोटर्सने उद्योगातील सरासरीच्‍या तुलनेत महिला (Women) खरेदीदारांमध्‍ये दुप्‍पट वाढ पाहिली आहे, जेथे टियागो.ईव्‍हीच्‍या विक्रीमध्‍ये 24 टक्‍के महिला खरेदीदार आहेत, तर जवळपास 25 टक्‍के खरेदीदार पहिल्‍यांदाच कार खरेदी करणारे होते, ज्‍यांनी प्रत्‍यक्ष आयसीई कारपूर्वी ईव्‍ही कार खरेदी केली आहे. टियागो.ईव्‍ही टियागो ब्रॅण्‍ड विक्रीमध्‍ये 35 टक्‍क्‍यांहून अधिक योगदान देते.

Tata Motors EV Sales
Upcoming Electric SUV : Maruti ची Tata ला जबरदस्त टक्कर ! दमदार रेंजसह Electric SUV होणार लवकरच लॉन्च...

टाटा मोटर्सने नुकतेच उच्‍च दर्जाच्‍या व हाय टेक फिचर अपग्रेडसह नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सझेड+ एलयूएक्‍सला अपग्रेड केले. मॅक्‍सच्‍या या टॉप ऑफ द लाइन व्‍हेरिएण्‍टमध्‍ये हार्मनची 26.03 सेमी (10.25 इंच) टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, हाय रिझॉल्‍यूशन, हाय डेफिनिशन डिस्‍प्‍लेसह स्लिक रिस्‍पॉन्‍स, वाय-फायवर अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, हाय डेफिनिशन रिअल व्‍ह्यू कॅमेरा, उच्‍चस्‍तरीय ऑडिओ परफॉर्मन्‍ससह शार्प नोट्स व विस्‍तारित बास परफॉर्मन्‍स, 6 भाषांमध्‍ये वॉईस असिस्‍टण्ट, सहा भाषांमध्‍ये (इंग्रजी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी) 180 हून अधिक वॉईस कमांड्स, तसेच नवीन यूजर इंटरफेस (UI) आहे.

50 हजार युनिट्सच्‍या विक्री टप्‍प्‍यापर्यंत पोहोचत आणि विश्‍वसनीय झिप्‍ट्रॉन तंत्रज्ञानाच्‍या आधारावर जवळपास 800 दशलक्ष किलोमीटर अंतर पार करत नेक्‍सॉन ईव्‍ही भारतातील पहिल्‍या क्रमांकाची इलेक्ट्रिक वेईकल आहे आणि सध्‍या वेईकलच्‍या नावे 26 विक्रम आहेत, ज्‍यामध्‍ये 4 दिवसांमध्‍ये काश्‍मीर ते कन्‍याकुमारी 4000 किमीचे अंतर पार करणारी फास्‍टेस्‍ट ईव्‍हीचा किताब समाविष्‍ट आहे.

Tata Motors EV Sales
Tata Altroz CNG: 5-स्टार सेफ्टी रेटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ; जबरदस्त मायलेजसह Tata Altroz ​​CNG भारतात लॉन्च

ही वेईकल टाटा मोटर्सच्‍या इलेक्ट्रिफिकेशन मोहिमेमध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे आणि भारतातील सर्वाधिक विक्री होणारी ईव्‍ही म्‍हणून आपले स्‍थान यशस्‍वीरित्‍या स्‍थापित केले आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही नेक्‍सॉन ब्रॅण्‍ड विक्रीमध्‍ये 15 टक्‍क्‍यांहून अधिक योगदान देते.

तसेच, भारतामध्‍ये ईव्‍हींच्‍या अवलंबतेला चालना देण्‍यासाठी टाटा मोटर्सने सर्वांगीण ई-मोबिलिटी इकोसिस्‍टम ‘टाटा युनिईव्‍हीअर्स’ देखील सादर केली. या सिस्‍टममुळे व्‍यवहार्य ईव्‍ही वातावरण निर्मितीसाठी इतर टाटा ग्रुप कंपनीजच्‍या क्षमता व अनुभवांचा लाभ घेता येईल. टाटा युनिईव्‍हीअर्सच्‍या पाठबळाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना ई-मोबिलिटी ऑफरिंग्‍ज उपलब्‍ध होतील, ज्‍यामध्‍ये चार्जिंग सोल्‍यूशन्‍स, नाविन्‍यपूर्ण रिटेल अनुभव आणि सुलभ आर्थिक पर्यायांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com