Upcoming Electric SUV : Maruti ची Tata ला जबरदस्त टक्कर ! दमदार रेंजसह Electric SUV होणार लवकरच लॉन्च...

Maruti EVX VS Tata SUV : मारुती EVX ची Tata Curve इलेक्ट्रिक SUV ला जबरदस्त टक्कर...
Upcoming Electric SUV
Upcoming Electric SUV Saam Tv
Published On

Maruti VS Tata : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या टाटा मोटार्सचा 80 टक्के वाटा आहे. परंतु भारतातील सगळ्यात मोठी कंपनीने भारतात अजूनही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पाऊल उचलेले नाही.

२०२४ मध्ये मारुती (Maruti) सुझुकी इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहे. त्याचवेळी टाटा मोटर्स देखील पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला कर्व्ह संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप लाँच करण्याचा मार्गावर आहे.

Upcoming Electric SUV
Monsoon Car Tips : पावसाळ्यात अचानक तुमची बाईक-कार अडकली तर, कशी वाचवाल ? जाणून घ्या या खास टिप्स

1. मारुती सुझुकी EVX

मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये EVX इलेक्ट्रिक SUV ची संकल्पना मांडली होती. २०२४ मध्ये मारुतीचे मॉडेल मार्च महिन्यात भारतीय (Indian) बाजारपेठेत लॉन्च करण्याची शक्यता आहे. ही कार Mahindra XUV400 आणि आगामी Creta EV ला टक्कर देणार आहे.

स्पेसिफिकेशन्स

LFP ब्लेड सेलसह 60kWh बॅटरी पॅकही मिळण्याची शक्यता आहे. नवीन EVX इलेक्ट्रिक SUV बॉर्न-EV प्लॅटफॉर्मवर डिझाइन आणि विकसित केली जाईल. यातून 550 किमीची रेंज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

Upcoming Electric SUV
Tata Will Manufacture iPhone 15: अभिमान! प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आयफोन आता भारतीय कंपनी बनवणार.. 'टाटा'चे मोठे पाऊल..

आगामी काळात ईव्ही प्लॅटफॉर्म मारुती सुझुकी आणि टोयोटा भविष्यातील इतर ईव्हीसाठी वापरु शकतो असे सांगितले जात आहे. मारुतीची ही EVX इलेक्ट्रिक SUV गुजरात मधून तयार केली जाणार आहे. याकारची लांबी सुमारे 4000 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि उंची 1600 मिमी असेल आणि व्हीलबेस सुमारे 2700 मिमी असेल.

2. टाटा कर्व ईव्ही

Tata Motors ने एप्रिल 2022 मध्ये Curve EV संकल्पना मांडली होती. कंपनीने कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये त्याची ICE आवृत्ती आणली. तसेच Curve SUV Coupe चे मॉडेल हे 2024 मध्ये लॉन्च केले जाईल. नवीन SUV ICE आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह ऑफर केली जाईल. त्याची स्पर्धा महिंद्रा XUV400, MG ZS EV, Hyundai Kona EV आणि येणाऱ्या Hyundai Creta Electric आणि Maruti E VX शी होईल. हे Gen 2 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे मुळात टाटाच्या अल्फा प्लॅटफॉर्मची आवृत्ती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com