Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

Bike Care Tips In Summer: उन्हाळ्यात बाईकमध्ये अनेक समस्या होतात. कधी पेट्रोल गळती तर कधी इंजिन गरम होते. त्यामुळे उन्हाळ्यात बाईकची खास काळजी घ्यायची असते.
Bike Care
Bike CareSaam Tv

उन्हाळा सुरु झाला आहे. देशात काही ठिकाणी ४०-४५ अंश तापमान आहे. या कडाक्याच्या उन्हाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांसोबतच वाहनेदेखील खराब होत आहे. उन्हाळ्यात बाईकमध्ये अनेक समस्या होतात. कधी पेट्रोल गळती तर कधी इंजिन गरम होते. त्यामुळे उन्हाळ्यात बाईकची खास काळजी घ्यायची असते.

बाईक नियमितपणे सर्व्हिसिंग करावी

उन्हाळ्यात तुम्ही तुमची बाईक नेहमी साफ ठेवावी. बाईक चालवताना इंजिनचे तापमान वाढते. त्यामुळे इंजिन खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत इंजिनमधील तेल खराब होते. त्यामुळे बाईकची सर्व्हिसिंग करावी.

एअर फिल्टर स्वच्छ करा

बाईकमधील एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवा. एअर फिल्टर इंजिनला शुद्ध हवा देण्याचे काम करते. उन्हाळ्यात धूळ जास्त असते. ही धूळ बाईकच्या इंजिनमध्ये जाते. त्यामुळे एअर फिल्टर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एअर फिल्टर स्वतः साफ करु शकता. त्याचसोबत मेकॅनिकची मदत घेऊ शकता.

Bike Care
Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

टायर्सची काळजी

उन्हाळ्यात टायरमध्ये आवश्यक तेवढीत हवा भरण्याचा प्रयत्न करा. टायरमध्ये कमी किंवा जास्त हवा भरल्यास बाईकमधील इंधनाचा वापर वाढतो, टायर्सदेखील लवकर खराब होतात. तसेच उन्हाळ्यात टायर खूप जास्त गरम होतात. त्यामुळे टायर खराब होऊ शकतात.

बाईक उन्हात उभी करु नये

उन्हाळ्यात खूप जास्त ऊन असते. त्यामुळे बाईक कधीच उन्हात पार्क करु नये. यामुळे इंजिन खराब होते.

Bike Care
Bharat 6G: भारताकडून 6G साठी मोठं पाऊल, इंटरनेटचा स्पीड आणखी वाढणार; युरोप इंडस्ट्री अलायन्ससोबत करार होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com