SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की SIP; मुलांच्या भविष्यासाठी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर?

SSY Vs SIP Investment For High Return: मुलांच्या भविष्यासाठी आतापासून गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. तुम्ही सुकन्या समृद्धी योजना किंवा SIP मध्ये गुंतवणूक करु शकतात. दोन्ही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो.
SSY Vs SIP
SSY Vs SIPSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या लहानपणीच गुंतवणूक केली तर भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्यांना खूप फायदा होणार आहे. तुम्हाला त्यांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. मुलींसाठी सरकारने खास सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर सर्वाधिक परतावा मिळतो. त्यामुळे मुलींच्या भविष्यासाठी फायदा होतो. याचसोबत अनेक लोक मुलांच्या नावाने SIP सुरु करतात. SIP मधील परतावा हा निश्चित नसतो परंतु जर तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीम आणि सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूक ही फायद्याची ठरेल. या योजनेत तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.

SSY Vs SIP
New Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना; पुढच्या महिन्यापासून होणार सुरू, काय मिळतील लाभ?

म्यूच्युअल फंडच्या इक्विटी स्कीमच्या SIP मध्ये गुंतवणूक (Investment In SIP)

म्युच्युअल फंडच्या इक्विटी स्कीमच्या SIP मध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात. यामध्ये दर महिन्याला एका ठरावीक तारखेला ठरावीक रक्कम तुमच्या बचत खात्यातून कट होईल जाणार आहे. या योजनेत तुम्ही १००० रुपयेदेखील गुंतवू शकतात. जर तुम्ही १००० गुंतवले तर वर्षाला १२००० रुपये जमा होतील. जर तुम्ही २० वर्षे ही गुंतवणूक केली तर २.४ लाख रुपये गुंतवाल. जर आपण यामध्ये १२ टक्के रिटर्नदेखील धरले तरी तुमच्याकडे ९.६८ लाख रुपये जमा होतील.

SSY Vs SIP
SBI SIP Scheme: फक्त १०,००० रुपयांची SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती; 'या' म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा अन् मालामाल व्हा

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक (Sukanya Samruddhi Yojana)

तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकतात.या योजनेतील गुंतवणूकीवर इन्कम टॅक्स 80C अंतर्गत कर सवलत मिळते. १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स भरावा लागत नाही. जर या योजनेत तुम्ही महिन्याला १००० रुपये जमा केले तर २० वर्षात २.४ लाख रुपये तुम्ही गुंतवणार आहात. यावर ८.१ टक्के रिटर्न म्हणजेच ६.०७ लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत.

तुमच्यासाठी कोणती योजना फायदेशीर?

जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त परतावा मिळणार आहे. हा परतावा मार्केटमधील रिटर्नवर अवलंबून असतो. हा कमीदेखील होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे थोडे रिस्क आहे. परंतु सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. या योजनेत तुमचे पैसे कुठेही जाणार नाही.

SSY Vs SIP
Government Scheme: पाचवी पास महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेमुळे व्हाल स्वावलंबी, कमवाल लाखांच्या घरात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com