Sukanya Samriddhi Yojana: घरात ३ मुली आहेत? सुकन्या समृद्धी योजनेत तिघींच्याही नावाने खातं उघडता येतं का? नवी अपडेट समोर

Girl Child Savings : सुकन्या समृद्धी योजनेत तीन मुलींचं खातं उघडता येतं की नाही. या योजनेची पात्रता लगेचच घ्या जाणून.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanasaam tv
Published On: 

सध्याची महागाई पाहता, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मुलांच्या भविष्यातील खर्चासाठी काही रक्कम त्यांच्या नावाने एखाद्या योजनेत गुंतवावी. त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा बेस्ट ऑप्शन मानला जातो. पण ज्यांच्या घरात तीन मुली आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. तर या योजनेअंतर्गत घरातल्या तीन मुलींच्या नावाने या योजनेत खातं उघडता येतं. मात्र यासाठी सरकारने ठरवलेल्या नियमांची पूर्तता करणं गरजेचं आहे.

तीन मुलींच्या नावाने खाते कधी उघडता येते?

सुकन्या समृद्धी योजनेत सामान्यतः एका कुटुंबातल्या दोन मुलींच्या नावाने खातं उघडता येतं. पण पहिल्या प्रसूतीत जुळ्या किंवा तिळ्या मुलींचा जन्म झाल्यावर, नियमांनुसार तिन्ही मुलींच्या नावाने खातं उघडण्याची परवानगी मिळू शकते.

Sukanya Samriddhi Yojana
LIC Jeevan Utsav: ५ लाखांच्या LIC पॉलिसीतून वर्षाला मिळू शकतात ५० हजार रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

तसेच, पहिल्या प्रसूतीत एक मुलगी आणि दुसऱ्या प्रसूतीत जुळ्या किंवा तिळ्या मुलींचा जन्म झाल्यावर काही अटींनुसार तिसरं खातं उघडचता येतं. त्यासाठी हॉस्पिटलचे आवश्यक प्रमाणपत्र लागेल. त्यामुळे खातं उघडण्याआधी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत नियमांची खात्री करून घ्यावी.

Sukanya Samriddhi Yojana
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालय उपचार नाकारतंय? लगेच करा हे काम

तीन खात्यांतून २.१५ कोटी रुपये कसे जमा होतील?

सुकन्या समृद्धी योजनेत एका खात्यामध्ये आर्थिक वर्षात १.५ लाख रुपये जमा करता येतात. त्यामुळे तीन पात्र खात्यांमध्ये वर्षाला ४.५ लाख रुपये जमा करणं शक्य आहे.

दिलेल्या उदाहरणानुसार, ८.२ टक्के वार्षिक व्याजदर गृहीत धरल्यास एका खात्यात सुमारे ७१.८२ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. तीन खात्यांसाठी ही रक्कम सुमारे २.१५ कोटी रुपये होते. मात्र, हा अंदाज आहे; प्रत्यक्ष परतावा लागू व्याजदर आणि योजनेच्या अटींवर अवलंबून असेल.

खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात?

मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षांची होण्यापूर्वी खाते उघडता येते. खाते उघडताना किमान २५० रुपये जमा करावे लागतात. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये भरणे आवश्यक आहे. खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी त्याची मॅच्युरिटी होते. या योजनेत जमा रक्कम, व्याज आणि परिपक्वतेच्या रकमेवर लागू नियमांनुसार करसवलती मिळू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याचा व्याजदर, पात्रता आणि अधिकृत नियम तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com