Subhadra Yojana: सरकारच्या 'या' योजनेत महिलांना मिळतात १०,००० रुपये; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Subhadra Yojana For Women: ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर वर्षाला १०,००० रुपये दिले जातात.
Subhadra Yojana
Subhadra YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी अनेक योजना आहेत. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्य सरकारनेही महिलांना मदत करण्याच्या हेतूने योजना राबवल्या आहेत. ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना(Subhadra Yojana) राबवली आहे. सुभद्रा योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जातात.

Subhadra Yojana
E Shram Scheme: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळते ३००० रुपयांनी पेन्शन; फक्त 'हे' काम करा

ओडिशा सरकारने (Odisha Government Scheme) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली आहे. २०२४ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत महिलांना वर्षाला १०,००० रुपये दिले जातात. दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. प्रत्येक हप्त्यामध्ये प्रत्येकी ५०००-५००० रुपये दिले जातात.

सुभद्रा योजना ही फक्त ओडिशातील महिलांसाठी आहे. या योजनेत महिलांना पहिल्या वर्षाचे पैसे मिळालेदेखील आहेत. महिलांच्या थेट बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल.

पात्रता

सुभद्रा योजनेसाठी फक्त ओडिशातील महिला अर्ज करु शकतात.

महिलांचे नाव राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम किंवा राज्य खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डमध्ये नाव असायला हवे.

या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

२१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

Subhadra Yojana
LIC Jeevan Shanti Scheme: मस्तच! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC जीवन शांती पॉलिसी आहे तरी काय?

अर्जप्रक्रिया

सुभद्रा योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.https://subhadra.odisha.gov.in/index.html या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. सर्व आवश्यक माहिती भरायची आहे. याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडीत जाऊनदेखील अर्ज करु शकतात. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाल्यानंतर सुभद्रा डेबिट कार्ड दिले जाते. या योजनेत तुम्हाला दोन हप्त्यांमध्ये १०,००० रुपये दिले जाते.

Subhadra Yojana
Government Scheme : तरुणांसाठी सरकारची धासू योजना, मोफत ट्रेनिंग अन् महिन्याला ८००० रुपयांची स्टायपेंड, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com