Stock Market : शेअर बाजारात तेजीची घंटी! सेन्सेक्सने केली मोठी कमाल, कोणते १० शेअर्स चमकले?

Stock Market update: शेअर बाजारात तेजीची घंटी वाजली आहे. आज शुक्रवारी सेन्सेक्सने मोठी कमाल केली आहे. आज काही शेअर्स तुफान तेजीत दिसत आहे.
 शेअर बाजार
Stock Market HighSaam Tv
Published On

नवी दिल्ली : शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात सेन्सेक्सने १००० अंकांनी उसळी घेत ७९,९८४.२४ वर पोहोचला. निफ्टीनेही २५६.५० अकांनी वधारून २४,३७३ वर पोहोचला. निफ्टी आज २४,३८६.८५ वर सुरु झाला. तर सेन्सेक्स ७९,९८४.२४ वर सुरु झाला. सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्समध्ये उसळी दिसून आली.

टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये २.६ टक्क्यांनी उसळी दिसून आली. टेक महिंद्राचा शेअर १५०० वर पोहोचला. तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये २.५ टक्क्यांनी वधारला. एचसीएल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एनटीपीसीचा शेअर देखील २ टक्क्यांनी वधारला. या व्यतिरिक्त टॉप ३० सेन्सेक्समध्ये सर्वात कमी तेजी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये दिसून आली. बँक निफ्टीमध्येही ४०० अंकांनी तेजी दिसून आली.

 शेअर बाजार
Business Idea: लवकर सुरु करा राखीचा बिझनेस; रक्षाबंधनापूर्वी व्हाल लखपती

कोणत्या १० शेअर्समध्ये तेजी?

डिफेन्स क्षेत्रातील कोचिन शिपयार्डचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले. अफ्फेल इंडियाच्या शेअर्सने ६ टक्क्यांनी उसळी घेतली. त्यानंतर CAMS च्या शेअर्समध्ये ३.८६ टक्क्यांनी तेजी दिसून आली. मिडकॅप स्टॉकमध्ये OFSS शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी उसळी दिसून आली. एचपीसीएलच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी तेजी दिसली. एम-पैसा शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. Eicher Motors चे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले. तर ओएनजीसीचे शेअर ३.३६ टक्क्यांनी वधारला. एबीबी इंडियाचा शेअर ३.७१ टक्क्क्यांनी वधारून व्यवहार करत आहे.

अचानक बाजारात तेजी कशी आली?

अमेरिकेच्या बाजारात अचानक तेजी पाहायला मिळाली. नॅस्डॅक इंडेक्समध्ये २.८७ टक्क्यांनी तेजी दिसून आली. डाऊ जोननेही १.७१ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. जपानचा शेअर बाजार १.२६ टक्क्यांनी वधारला आहे. या सर्व शेअर बाजारातील तेजीमुळे भारताचा शेअर बाजार वधारला आहे.

 शेअर बाजार
Business Idea: फक्त 50,000 मध्ये सुरू करू शकता 'हे' 7 व्यवसाय, कमाई होईल शानदार

अमेरिकेतील मंदीच्या सावटामुळे यूरोपपासून अमेरिकेपर्यंत शेअर बाजार कोसळलं होतं. आज शेअर बाजारात स्थैर्य आलं आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास ग्लोबल मार्केटवर टिकून आहे. यामुळे तेजी दिसत आहे. जागतिक बाजारामुळे शेअर बाजार वधारला आहे. एलआयसी आणि अन्य कंपन्यांच्या तिमाहीचे परिणाम शेअर बाजारावर दिसत आहेत. शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसई मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com