Bluebugging: तुमच्या मोबाइल फोनचे ब्लूटूथ नेहमी ऑन असते? ब्लूबबिंगद्वारे हॅक होण्याचा धोका

What Is BlueBugging: आजकाल जगभरात लाखो लोक स्मार्टफोनचा वापर करतात. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक कामे सोपी होतात. त्याचसोबत स्मार्टफोनचा वापर करुन सायबर क्राइम होतात. सध्या सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे.
 Bluebugging
Bluebugging Saam Tv
Published On

Smartphone Hack Through Bluebugging:

सध्या जगभरात लाखो लोक स्मार्टफोनचा वापर करतात. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक कामे सोपी होतात. तसेच स्मार्टफोनमुळे अनेकदा फ्रॉडदेखील होतात. त्यामुळे सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.

स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या मार्गाने हॅकर्स फसवणूक करतात. अनेकदा ब्लूटूथच्या मदतीने हॅकर्स फ्रॉड करतात. जर तुम्हीही तुमच्या फोनचे ब्लूटूथ सतत ऑन ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते. सतत ब्लूटूथ ऑन ठेवल्याने ब्लूबबिंग होते. त्यामुळे फ्रॉड होऊ शकतात. (Latest News)

ब्लूबबिंग म्हणजे काय?

ब्लूबबिंग हे स्मार्टफोनसाठी खूप धोकादायक आहे. याद्वारे हॅकर्स तुमचा फोन हॅक करुन तुमची पर्सनल माहिती मिळवू शकतात. या माहितीच्या आधारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. ब्लूबबिंग म्हणजे हॅकर्स ब्लूट्यूथच्या मदतीने तुमचा फोन हॅक करतात आणि त्यात मालवेअर इनस्टॉल करतात.

ब्लूबबिंगमुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्या लोकांचे ब्लूटूथ नेहमी ऑन असते. त्या लोकांना हॅकर्स लक्ष करतात आणि त्यांची माहिती मिळवतात. त्याद्वारे फसवणूक करतात.

 Bluebugging
Fake Calls: फेक कॉल्स रोखण्यात टेलिकॉम कंपन्या अयशस्वी; ट्रायने ठोठावला कोटींचा दंड

या गोष्टी करु नये

  • ब्लूबबिंग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ब्लूटूथ ऑन करणे टाळा.

  • तुमच्या ब्लूटूथचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. जेणेकरुन कोणीही तो पासवर्ड ट्रॅक करु शकणार नाही.

  • जेव्हा गरज असेल तेव्हाच ब्लूटूथ ऑटो जॉइन पर्याय चालू करता. अन्यथा हा पर्याय नेहमी बंद ठेवा.

  • सार्वजनिक ठिकाणी ब्लूटूथ ऑन ठेवू नका. त्याद्वारे हॅकर्स तुमच्या फोनमधील माहिती मिळवू शकता.

 Bluebugging
UPSC-IIT JEE: UPSC की IIT JEE कोणती परीक्षा कठीण? आनंद महिंद्रांच्या ट्वीटमुळे वाद; पोलीस उपायुक्तांनी दिलेले उत्तर होतंय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com