UPSC आणि IIT JEE या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेल्या X पोस्टमुळे सोशल मीडियावर यूपीएससी विरुद्ध आयआयटी जेईई वादाला तोंड फुटलं आहे. IPS अधिकारी मनोज शर्मा आणि IRS अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित '12वी फेल' चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर आनंदत महिंद्रा यांनी म्हटलं की, मी देशातील प्रवेश परीक्षांबद्दल अनेक तरुणांशी बोललो आणि कोणती परीक्षा सर्वात कठीण आहे याबद्दल त्यांचे मत घेतले.
आनंद महिंद्रा यांनी म्हटलं की, एक आयआयटी पदवीधर होता, ज्याने आपलं स्टार्टअप सुरु केलं होतं. त्याने यूपीएससीची परीक्षाही दिली होती. आयआयटी जेईईपेक्षा यूपीएससी खूप कठीण आहे, असे त्याने स्पष्टपणे सांगितलं. असं असेल तर, अशा परिस्थितीत ही क्रमवारी बदलणे आवश्यक आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.
'द वर्ल्ड रँकिंग'ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये IIT क्रमांक- १ वर आणि JEE क्रमांक-2 वर तर UPSC क्रमांक-3 आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवर ही यादी देखील शेअर केली आहे. तसेच UPSC आणि IIT JEE मध्ये कोणती परीक्षा सर्वात कठीण आहे? असा प्रश्नही विचारलाय. त्यांच्या या प्रश्नाला आयपीएस अर्चित चांडक यांनी उत्तर दिलंय.
नागपूरच्या बीपी विद्या मंदिर,भवन येथून अर्चित यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केले. 2012 मध्ये जेईई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अर्चित आयआयटी दिल्लीला आले. पुढे कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली. कॉलेजच्या दिवसांतच त्यांनी शासकीय नोकरी मिळवण्याचा ध्यास मनात बाळगला होता.
इंटर्नशिपदरम्यान अर्चित यांना एका जपानी कंपनीने ३५ लाख रुपयांचे पॅकेजही ऑफर केले. पण त्यांनी ती नोकरी नाकारली आणि नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली.
UPSC-IIT JEE मध्ये सर्वात कठीण कोणती?
आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी दोन्ही परीक्षांमधील फरक स्पष्ट करताना काही मुद्दे मांडले आहेत.
यूपीएससी सीएईच्या उलट आहे. कारण येथे तुम्हाला रँकींगमध्ये आल्यावरही सीट मिळत नाही तर सीएसईमध्ये सहज सीट मिळते.
परीक्षेमध्ये सतत बदल होतो. यामध्ये टाइम टेबल, पेपर पॅटर्न आणि नियम या गोष्टी बदलत असतात.
जेईईमध्ये लॉजिकल आणि रिजनींग प्रश्न जास्त असतात. तर यूपीएससीमध्ये ऑब्जेक्टीव आणि त्यात स्वत: विश्लेशन करावे लागेल असे प्रश्न असतात.
JEE साठी तुम्ही चांगला कोचींग क्लास लावून त्यानुसार अभ्यास करू शकता. मात्र UPSC मध्ये तुम्हाला सेल्फ स्टडी महत्वाची असते.
JEE चा अभ्यासक्रम सतत बदलत नाही. दिलेले विषय पूर्ण करायचे असतात. मात्र UPSC साठीचा अभ्यासक्रम फार जास्त असतो आणि जितके वाचावे तितके कमीच असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.