Skoda Auto India लवकरच देशात आपली नवीन कार लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या या कारची घोषणा केली आहे. कंपनीची ही कार एक सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. कंपनीचे हे नवीन मॉडेल भारतातच विकसित केले जाणार असून वर्षभरात बाजारात दाखल होणार आहे. (Latest News)
कंपनीची ही नवीन सबकॉम्पॅक्ट कार MQB AO IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही कार एसयूव्ही कुशाक आणि स्लाव्हियाच्या खाली स्थित असेल. या दोन कंपनीच्या आधुनिक आणि देशात बनलेल्या कार आहे. या कारचे उत्पादन पुढील सहा महिन्यात होईल. कंपनीच्या या कारबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Skoda India ने आपल्या एक्स अकाउंटवरुन फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. Skoda चे भारतात एक नवीन पर्व सुरु होत आहे. या नवीन सेगमेंटमुळे भारतीय बाजारपेठेत खूप प्रगती होणार आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असणार आहे, असं कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्हीची उत्पादन क्षमता ३० टक्क्यांमी वाढवली आहे. कंपनी भारतात नवीन लूक आणि फीचरसह कार लाँच करणार आहे. कंपनी एका वर्षात एसयूव्हीच्या १ लाख युनिट्सची विक्री होईल अशी अपेक्षा आहे. कंपनीने अद्याप कारबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच कार लाँचची अधिकृत तारीख समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.