महिन्याला फक्त ₹१००० ची SIP करा अन् १० लाख रूपये मिळवा, वाचा गुतंवणुकीचे A टू Z कॅल्क्युलेशन

SIP Investment Plan: एसआयपीमधील गुंतवणूक ही सुरक्षित आहे. यामध्ये तुम्हाला लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली तर जबरदस्त परतावा मिळेल.
SIP
SIPSaam Tv
Published On

प्रत्येकाला आपले भविष्य उज्जवल करायचे असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असते. यासाठी तुम्हाला पैशांची बचत करायला हवी. फक्त पैशांची बचत करण्यापेक्षा तुम्ही हे पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त परतावा मिळेल. यासाठी तुमच्याकडे एक उत्तम ऑप्शन आहे तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP). यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.

एसआयपीमध्ये तुम्हाला फक्त महिन्याला १००० रुपयांची गुंतवणूक करायची आहे. यानंतर तुम्हाला २ लाख रुपये मिळणार आहे. यामधील लाँग टर्म इन्वेस्टमेंट खूप फायद्याची आणि सुरक्षित असते.

SIP
LIC Scheme : प्रत्येक महिन्याला ७००० रूपये, महिलांसाठी LIC ची खास योजना, वाचा सविस्तर

गुंतवणूकीवर किती परतावा मिळणार? (SIP Investment Returns)

तुम्हाला फक्त १००० रुपयांची गुंतवणूक करुन २ लाख रुपये मिळणार आहे. म्युच्युअल फंडवर लाँग टर्मसाठी जवळपास १२ टक्के रिटर्म मिळते.या योजनेत तुम्हाला जर १२ टक्के परतावा मिळतो. दरम्यान, गुंतवणूकीवर परतावा मिळतो तसेच त्या डिविडेंडवरदेखील परतावा मिळतो.

१० वर्षात मिळणार २ लाख रुपये

या योजनेत जर तुम्ही १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर २ लाख रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षी तुम्ही १२००० रुपये मिळणार आहे. त्यावर ८०९ नफा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ३,२४३ रुपये नफा मिळणार आहे. म्हणजे २७,२३४ रुपये तुमच्याकडे जमा होणार आहे. तिसऱ्या वर्षासाठी ७,५०७ रुपये नफा मिळणार आहे. १२व्या वर्षी तुम्हाला १,११,८५१ रुपये परतावा मिळणार आहे. यामध्ये तुम्ही १,२०,००० रुपये गुंतवणार आहात. त्यावर १,११,८५१ रुपये परतावा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला २,३१,८५१ रुपये मिळणार आहे.

SIP
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! ५ वर्षात मिळणार ३५ लाख रुपये; कसं? जाणून घ्या

२० वर्षात मिळणार जवळपास १० लाख रुपये (Get 10 Lakh In Just 20 Years)

जर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीवर १२ टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला १० वर्षात २ लाख रुपये मिळणार आहे. जर तुम्ही १५ वर्षांसाठी एसआयपी केली तर तुम्हाला ५,०४,५७६ रुपये मिळणार आहे. यामध्ये फक्त ३,२४,५७६ नफा मिळणार आहे. जर तुम्ही २० वर्षांसाठी एसआयपी केली तर तुम्ही २,४०,००० रुपये गुंतवणार आहात. यावर तुम्हाला ७,५९,१४८ रुपये मिळणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जवळपास ९,९९,१४८ रुपये मिळणार आहे.

SIP
Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com