Silver Prices Hike : चांदीचा भाव १ लाख रुपयांवर पोहचण्याची शक्यता; आजची किंमत काय?

Silver prices may touch Rs 1 lakh : दिवळीपर्यंत चांदीचा भाव १ लाख रुपयांवर जाऊ शकतो अशी शक्यता काही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
Silver prices may touch Rs 1 lakh
Silver Prices HikeSaam TV
Published On

राज्यात सोन्यासह चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशात महागाईचा भडका उडाला असून सध्या चांदीचा भाव ९०,००० रुपये प्रति किलोच्या पुढे पोहचला आहे. विश्लेषक आणि अभ्यासकांनी यावर असं म्हटलं आहे की, चांदी दिवाळीपर्यंत १ लाख रुपये पार करू शकते.

Silver prices may touch Rs 1 lakh
Gold Silver Price Hike: सोने-चांदीचा भाव झपाट्याने वाढला; अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदाच घडलं असं

शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी चांदीचा भाव ३१ डॉलर प्रति किलो इतका होता. हा भाव आणखी वाढून थेट १ लाख रुपये प्रति किलो होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने चांदीची मागणी सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढली आहे. सध्या भारतात प्रति किलो चांदी ९० हजार रुपयांना विकली जातीये. शुक्रवारी MCX वर चांदी महागली असून ही किंमत थेट ९०,३०० रुपये प्रति किलोवर आहे.

ऑगस्ट महिन्यात भारतात ११,००० करोड रुपयांची चांदी इंपोर्ट करण्यात आली. तसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १,३०० कोटींची चांदी इंपोर्ट करण्यात आली होती. यावरून भारतात चांदीची मागणी वाढल्याचे लक्षात येते.

गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात झालेले बदल

सीमा शुल्क कपातीची घोषणा केल्यानंतर चांदीचा भाव कमी झाला होता. १२ सप्टेंबरला चांदी ८६,५०० रुपये प्रति किलो होती. त्यानंतर १३ तारखेला भाव तब्बल ३ हजार रुपयांनी वाढला आणि चांदी ८९,५०० रुपयांवर पोहचली. १४ तारखेला दुसऱ्या दिवशी भाव आणखी २ हजार ५०० रुपयांनी वाढला होता. त्यावेळी चांदीचा भाव ९२,००० रुपयांवर पोहचला. १६ सप्टेंबरपर्यंत भाव आणखी वाढून ९३,००० रुपये झाला. १७ आणि १८ तारखेला पुन्हा भाव १ हजार रुपयांनी कमी झाला. त्यानंतर पुन्हा वाढ होऊन आज चांदीची किंमत ९३,००० रुपये प्रति किलो आहे.

सोनं १ लाख रुपये तोळा होणार?

चांदी बरबोरच सोन्याचा भाव सुद्धा असाच महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा दर दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर १ लाख रुपये तोळा होऊ शकतो असं काही अभ्यासकांनी म्हटलं आहे. दिवळी नंतर सर्वत्र लग्नसराईला सुरुवात होते. लग्नसराई म्हटलं की सोन्याचे दागिने घ्यावेच लागतात. अशात ऐन लग्न सराइत सोनं महागल्यास सामान्य नागरिकांना दागिने बनवणे फार कठीण होणार आहे.

Silver prices may touch Rs 1 lakh
Gold Silver Price Hike: सोनं-चांदी महागलं; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com