Gold Silver Price Hike: सोने-चांदीचा भाव झपाट्याने वाढला; अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदाच घडलं असं

Gold Silver Price Hike In Maharashtra: अर्थसंकल्पानंतर आज पहिल्यांदाच सोन्याच्या किंमती ७२ हजारांच्या पार गेल्या आहे. सोने चांदीच्या किंमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikeSaam Tv
Published On

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोने- चांदीच्या भावात आज वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.अमेरिकेतही सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. महाराष्ट्रात जळगावात सीमाशुल्क कपातीच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत.

देशाच्या अर्थसंकल्पानंतर २५ दिवसांनी सोने पुन्हा एकदा ७२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. चांदीच्याही भावात शनिवारी एक हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदी ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे..

२३ जुलैला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोंने-चांदीवरील सीमा शुल्क कपातीची घोषणा करण्यात आली. दिवशी सकाळी सोन्याचे भाव एक हजार ४०० रुपयांनी घसरले होते. त्यावेळी सोने ७२ हजार १०० रुपयांवर आले होते. त्यानंतर पुन्हा एक हजार ४०० रुपयांनी घसरण झाली व सोने एकूण दोन हजार ८०० व चांदी तीन हजार ८०० रुपयांनी घसरली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यात अमेरिकेतील बँकांची स्थिती व इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोन्याच्या भावात थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी सकाळी सोने ७२ हजार १०० रुपयांवर होते. दुसरीकडे ८३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे भाव

८ ग्रॅम सोने ५८,२१६ रुपये प्रति तोळा विकले जात आहे. तर १ तोळा सोने ७२,७७० रुपयांवर विकले जात आहे तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,२७,७०० रुपयांवर विकले जात आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,३६० रुपये आहे तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,७०० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ६,६७,००० रुपये आहे. सोन्याचे भाव वाढल्याने सोने-खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.

Gold Silver Price Hike
Gold Silver Price: आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव घसरले की वाढले? जाणून घ्या...

चांदीच्या किंमती

८ ग्रॅम चांदी ६८८ रुपयांनी विकली जात आहे तर १० ग्रॅम चांदीची किंमत ८६० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदी ८,६०० रुपयांवर विकली जात आहे तर १००० ग्रॅम चांदी ८६,००० रुपयांवर विकली जात आहे.

Gold Silver Price Hike
Post Office MIS Scheme: फक्त एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला ५००० रुपये कमवा; पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना नक्की आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com