Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'विश्वासघात', मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात

Mallikarjun Kharge On Modi Government: 'या अर्थसंकल्पात रोजगाराशी संबंधित तथाकथित प्रोत्साहन योजना आणण्यात आल्या आहेत. मात्र हा फक्त देखावा आहे आणि त्याचा कोणत्याही तरुणांना फायदा होणार नाही.', असा घणाघात मल्लिकार्जु खरगे यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विश्वासघात, मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात
Mallikarjun Kharge On Modi GovernmentSaam TV
Published On

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने फक्त विश्वासघात केलाय अशी टीका त्यांनी केली आहे. 'या अर्थसंकल्पात रोजगाराशी संबंधित तथाकथित प्रोत्साहन योजना आणण्यात आल्या आहेत. मात्र हा फक्त देखावा आहे आणि त्याचा कोणत्याही तरुणांना फायदा होणार नाही.', असा घणाघात मल्लिकार्जु खरगे यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विश्वासघात, मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात
Kangana Ranaut : राहुल गांधींना स्वत:च्या जातीविषयी माहिती नाही; कंगना रणौत यांनी पोस्ट करत साधला निशाणा

केंद्रीय बटेजमधील 'ब' म्हणजे विश्वासघात असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 'मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात उद्योगांवर फक्त इंटर्नशिप लादण्यात आली असून त्यासाठी दीर्घकालीन उपाय दिसत नाही.' असा आरोप खरगे यांनी केला आहे. यासोबतच खरगे यांनी मोदी सरकारला त्यांच्या योजनांवर दोन प्रश्न विचारले आहेत. या योजनांची माहिती मोदी सरकार कधी देणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विश्वासघात, मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात
Dadar Railway Station: दादर स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, चंद्रशेखर आझाद यांची संसदेत मागणी

मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, 'अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार इंटर्नशिप हे पहिल्यांदाच नोकऱ्या घेण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यांना रोजगाराशीसंबंधित ५ प्रोत्साहन योजनांच्या रूपरेषेबद्दल काही कल्पना आहे.' मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ही अर्धवट कल्पना अंमलात आणण्यापूर्वी संबंधितांशी सल्लामसलत केली होती का?'

Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विश्वासघात, मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात
Uttarakhand Heavy Rain : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचं रौद्ररुप; जनजीवन पूर्णत: विस्कळीत, ११ जणांचा मृत्यू तर ४४ बेपत्ता

दुसरीकडे, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाने उद्योगांवर केवळ इंटर्नशिप लादली आहे. ज्यावर दीर्घकालीन उपाय नाही. या रोजगारसंबंधित प्रोत्साहन योजनांमध्ये सार्वजनिक कंपन्यांचा समावेश का करण्यात आला नाही?, असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. त्यांनी मोदी सरकारला विचारले की, 'एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तरुणांना सार्वजनिक क्षेत्रात आरक्षणाद्वारे भरती करू नये अशी भाजपची इच्छा आहे का? या सर्व योजना तात्पुरत्या रोजगार किंवा इंटर्नशिप का देत आहेत?'

खर्गे म्हणाले की, 'सेव्ह चेअर बजेट'च्या एका आठवड्यानंतर तथाकथित 'रोजगार-संबंधित प्रोत्साहन' योजनांबाबत मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल शिक्षण आणि उद्योगजगत स्पष्टतेची वाट पाहत आहेत. त्यांनी आरोप केला की, 'कोट्यवधी तरुणांना त्यांच्या नोकऱ्यांच्या दुर्दशेवर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. परंतु नरेंद्र मोदींचे सरकार तात्पुरता उपायही न करून त्यांचा विश्वासघात करत आहे.'

Mallikarjun Kharge: मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विश्वासघात, मल्लिकार्जुन खरगेंचा पुन्हा घणाघात
Wayanad Landslides Update: मृत्यूची दरड! वायनाड भूस्खलनातातील मृतांचा आकडा २५६ वर, २०० जण अजूनही बेपत्ता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com