Stock Market News Today : शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी; सेन्सेक्सने घेतली २८० अंकानी उसळी, निफ्टीनेही शिखर गाठलं

Stock Market News in Marathi : शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशीही उसळी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये बंद झाला. तर निफ्टीनेही सलग ११ व्या दिवशी नव शिखर गाठलं आहे.
Stock Market News
Stock Market NewsSaam tv
Published On

Stock Market update :

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशीही उसळी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये बंद झाला. तर निफ्टीनेही सलग ११ व्या दिवशी नव शिखर गाठलं आहे. याचा गुंतवणुकादारांना मोठा फायदा झाला. (Latest Marathi News)

आज शेअर बाजारात दिवसभराच्या व्यवहारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने २८१.५२ अंकानी उसळी घेतल्याने ७२,७०८.१६ वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने ८१.५५ अंकानी उसळी घेतल्याने २२,१२२.२५ वर बंद झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Stock Market News
Use of old mobile : जुना मोबाईल फेकू नका; असा करा स्मार्ट वापर, घरचेही होतील खूश

सोमवारच्या व्यवहारात Grasim Industries, Bajaj Finserv, Bajaj Auto, ICICI Bank आणि Cipla निफ्टी टॉप गेनर ठरले. तर Coal India, SBI Life Insurance, L&T, LTIMindtree आणि HDFC Life निफ्टी टॉप लूझर ठरले.

१६ फेब्रुवारीला सत्रात काय घडलं?

शेअर बाजारात १६ फेब्रुवारी तिसऱ्या व्यवहारातील सत्रात तेजी होती. या सत्रात सेन्सेक्स ३७६.२६ अंकानी म्हणजे ०.५२ टक्क्यांनी उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्स ७२,४२६.६४ अंकावर बंद झाला. तर निफ्टीने १२९.९५ अंक म्हणजे ०.५९ टक्क्यांनी उसळी घेतली. यामुळे निफ्टी २२,०४०.७० अंकावर बंद झाला.

Stock Market News
Voter ID अजून बनवला नाहीये? घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा कराल? वाचा सविस्तर

आईएलएस हॉस्पिटलचे ब्रँडच्या अंतर्गत जीपीटी हेल्थकेयर लिमिटेडच्या आयपीओसाठी १७७-१८६ रुपये प्रति शेअर खरेदीसाठी मोजावे लागू शकतात. कंपनीचा हा आयपीओ २२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत खुला असणार आहे. अँकर गुंतवणूकदार एक दिवस आधीच म्हणजे २१ फेब्रुवारीपर्यंत शेअर खरेदीसाठी बोली लावू शकता.

अमेरिकेतील बॉन्डच्या देशांतर्गत आणि जागतिक व्याजदरांवरील अनिश्चिततेदरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात भारतीय शेअर बाजारातून ३,७७६ कोटी रुपये काढले आहेत. परदेशी गुंतवणूकदार हे डेट किंवा बॉन्ड बाजारासाठी उत्साही आहेत. तसेच त्यांनी रिपोर्टिंग पीरियडमधून बॉन्ड बाजारातून तब्बल १६,५६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com