Voter ID अजून बनवला नाहीये? घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा कराल? वाचा सविस्तर

How To Apply Online for Voter ID Card : लोकसभा निवडणुका येत आहेत, देशभरात खासदारांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी मतदार कार्डासह इतर अनेक ओळखपत्रे महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय तुम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाही.
How To Apply Online for Voter ID Card
How To Apply Online for Voter ID CardSaam Tv
Published On

Apply Online for Voter ID Card :

लोकसभा निवडणुका येत आहेत, देशभरात खासदारांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी मतदार कार्डासह इतर अनेक ओळखपत्रे महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय तुम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाही. तुमच्याकडे व्होटर कार्ड नसेल किंवा तुम्हाला व्होटर कार्डमध्ये काही बदल करायचे असेल, तर सरकारी (Government) कार्यालयात जाण्याची गरज नाही.

आम्ही तुमच्यासाठी व्होटर कार्ड (Voter ID) बनवण्याचा आणि त्यात बदल करण्याचा एक ऑनलाइन मार्ग आणला आहे. या मध्ये तुम्ही Google Play Store वरून एक ॲप डाउनलोड करून त्यावर तुमची सर्व माहिती भरावी लागेल. आणि काही दिवसांनंतर, व्होटर कार्ड तुमच्या घरी येईल.

हे ॲप डाउनलोड करा

व्होटर कार्ड ऑनलाइन करण्यासाठी, तुम्हाला Android आणि iOS मोबाइलमधील Google Play Store आणि Play Store वरून भारतीय निवडणूक आयोगाचे व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करावा. या ॲपच्या मदतीने तुम्ही व्होटर कार्डमध्ये ऑनलाइन बदल करू शकता.

How To Apply Online for Voter ID Card
New Voter ID: मतदान ओळखपत्र हरवलं आहे? सोप्या पद्धतीने बनवा ड्युप्लिकेट कार्ड

नवीन Voter ID साठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये व्होटर हेल्पलाइन ॲप इन्स्टॉल करा. यानंतर तुम्हाला वोटर नोंदणी वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला ॲपमध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि आधार कार्ड यासारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वरती दिलेल्या बटणावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, BLO कडून व्हेरिफिकेशन केली जाईल आणि तुमचे नवीन व्होटर कार्ड तयार होईल आणि तुमच्या घरी येईल.

How To Apply Online for Voter ID Card
Aadhar-Voter ID Link: आधार कार्ड-मतदान ओळखपत्र लिंकसंदर्भात मोठी अपडेट, शेवटची तारीख कधी?

जुन्या व्होटर कार्डमध्ये बदल कसे करावे?

त्याच प्रकारे, तुम्ही व्होटर हेल्पलाइन ॲपद्वारे तुमच्या जुन्या व्होटर कार्डमध्ये बदल देखील करू शकता. यासाठी ॲपच्या शेवटी तक्रार आणि नोंदणी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही महत्त्वाचे माहिती भरा आणि काही दिवसांनी तुमचे नवीन व्होटर कार्ड तयार होऊन तुमच्या घरी पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com