

Share Market Explained : गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजाराने आज नवीन विक्रम रचला आहे. आज पहिल्यांदा शेअर बाजाराने 66,000 चा टप्पा ओलांडला आणि निफ्टीने 19,567 ची पातळी गाठली.
सेन्सेक्स 582 अंकांच्या वाढीसह 65,975 वर तर निफ्टी 156 अंकांच्या वाढीसह 19,540 वर ट्रेंड करत आहे. मात्र बाजारत इतकी तेजी कशी काय आली? यामागचं नेमकं कारण काय? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर याचेच आज आपण उत्तर जाणून घेणार आहोत.
यामुळे आली बाजारात तेजी
तज्ज्ञांच्या मते, देशातील महागाई कमी होणे, कच्च्या तेलाच्या किमती कमी होणे, भारतीय चलन रुपयाचे मजबूत होणे, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात झालेली वाढ आणि विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करत असल्याने शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
तीन वर्षांत सेन्सेक्स 78.4 टक्क्यांनी वाढला
जगातील अव्वल शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजार पाचव्या क्रमांकावर आहे. शेअर बाजाराचे सध्याचे मार्केट कॅप 301 लाख कोटी रुपये आहे.
जर आपण गेल्या 3 वर्षांचा विचार केला तर भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 78.4 टक्क्यांनी वाढला आहे.
यातच अमेरिकेचा शेअर बाजार जगात पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याचे मार्केट कॅप 2055 लाख कोटी रुपये आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात गेल्या 3 वर्षात 38.1 टक्के वाढ झाली आहे.
या वर्षात आतापर्यंत 82 IPO आले
या वर्षी आतापर्यंत भारतात 82 आयपीओ आले आहेत. तर गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 149 आयपीओ आले. 2017 हे भारतातील आयपीओच्या दृष्टीने सर्वोत्तम वर्ष होते. त्यानंतर एकूण 169 आयपीओ आले. 2018 मध्ये 165 IPO होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.