Atal Pension Yojana: दररोज फक्त ७ रूपये गुंतवा, दरमहा ५ हजार मिळवा; 'या' सरकारी योजनेचा लाभ नक्की कुणाला मिळतो?

Plan Your Retirement with Atal Pension Yojana: जर आपल्या सरकारी योजनेतून लाभ मिळवायचा असेल तर, अटल पेन्शन योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या योजनेमध्ये गु्ंतवणूक केल्यास भविष्यात पेन्शन सुरू होईल.
money
moneyyandex
Published On

सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा फायदा सामन्य व्यक्तींना होतो. जर आपल्या सरकारी योजनेतून लाभ मिळवायचा असेल तर, अटल पेन्शन योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या योजनेमध्ये गु्ंतवणूक केल्यास भविष्यात पेन्शन सुरू होईल. तसेच वृद्धापकाळात कुणाकडे हात पसरण्याची गरज भासणार नाही. या योजनेतून आपल्याला १००० ते ५००० रूपये पर्यंतची पेन्शन रक्कम मिळेल.

अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे. बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेला आणि खाजगी क्षेत्रात काम करणारा कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत ६० वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल.

money
Beed Crime: बायको नगरसेविका, मुंडे-वाल्मिकसाठी काम; देशमुख प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, सुग्रीव कराड आहे तरी कोण?

दररोज करा ७ रूपयांची बचत

जर तुम्ही १८ वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरूवात केली, तर साठीनंतर आपल्याला पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. दरमहा ५००० रूपये पेन्शन मिळवण्यासाठी आपल्याला दररोज ७ रूपये म्हणजेच दरमहा २१० रूपये जमा करावे लागेल. तसेच जर नावनोंदणी केल्यानंतर ६ महिने पैसे जमा केले नाही तर, तुमचे खाते गोठवले जाईल.

money
Dombivali News: शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाकडून मुलाचं अपहरण; कुटुंबीयांकडून मागितली 2,00,00,000 रुपयांची खंडणी, कल्याणमध्ये खळबळ

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. याशिवाय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर, आधार, ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे देखील आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजनेअंतर्गत सहजपणे खाते उघडू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com