स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमधून नागरिकांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. यामध्ये अनेक एफडी योजनांचादेखील समावेश आहे. अशीच एक योजना म्हणजे अमृत कलश योजना. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत तुम्हाला भरघोस व्याज मिळते. या योजनेचा कालावधी फक्त ४०० दिवसांचा आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत संपली आहे. मात्र, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
जेष्ठ नागरिक आपल्या पैशांची पुर्णपणे सुरक्षित असावी आणि त्यावरील व्याजाचे उत्पन्न जास्त मिळेल. या उद्देशाने एफडी मध्ये गुंतवणूक करतात. भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया नागरीकांचा पुर्णपणे विश्वास मिळवण्यात यशस्वी झाली आहे. अमृत कलश एफडी योजनेची मुदत नागरिकांसाठी फक्त ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात प्रचंड महागाई झाली होती. त्यावेळेस भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने रेपो रेटच्या दरात वाढ केली होती. तेव्हा नागरीक प्रचंड हैराण झाले होते. त्यावेळेस अनेक बॅंकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली. व्याजदरात वाढ केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाची 'अमृत कलश योजना' नागरिकांच्या सोयीसाठी आणली आहे. ही योजना तब्बल ४०० दिवसांची असणार आहे. या योजनेतून नागरिकांना ७.१० टक्के व्याज मिळणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना व्याज दरात ०.५० टक्क्यांहून जास्त म्हणजेच ७.६० टक्के व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच एका सामान्य व्यक्तीने १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला व्याज म्हणून वर्षाला ७,१०० रुपये मिळती. त्याच जर जेष्ठ नागरिकांनी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला व्याज म्हणून वर्षाला ७, ६०० रुपये मिळतील.
अमृत कलश एफडी योजना नागरिकांची लोकप्रिय योजना ठरली आहे. त्यात गुंतवणूकदार मोठ्या संख्येने गुंतवणूक करत आहेत. ही मुदत या आधी सुद्धा या योजनेची गुंतवणूक करण्यात आली होती. पहिल्यांदा १२ एप्रिल २०२३ रोजी मुदत वाढ करण्यात आली. २३ जून २०२३ रोजी दुसऱ्यांदा मुदत वाढ करण्यात आली. तसेच ३१ मार्च २०२४ रोजी चौथ्यांदा मुदत वाढ करण्यात आली. आता ३० सप्टेंबर २०२४ रोजी मुदत वाढ करण्यात आली. मात्र, ही मुदत फक्त ४०० दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे.
Written By: Sakshi Jadhav