Share Market : ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने घेतली मोठी झेप; अवघ्या ६३ रुपयांवरून १९०० वर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल

Share Market today : भारतचा ड्रोन २३ अब्ज डॉलरच्या अधिक जाऊ शकतो. या वृत्ताने ड्रोन बनवणारी कंपनी जेन टेक्नॉलॉजीजने मोठी झेप घेतलीये.
share market today
Share Market Latest News in Marathi Saam TV
Published On

मुंबई : भारत देश २०३० पर्यंत ड्रोनच्या जगतातील नवं हब होणार आहे. फिक्कीनुसार, भारताचा ड्रोन बाजार २३ अब्ज डॉलरहून अधिक असेल. या वृत्तानंतर ड्रोन बनवणारी कंपनी जेन टेक्नोलॉजीजच्या शेअरने चांगलीच उसळी घेतली. सकाळी बाजारात १७८२ सुरु झालेला शेअर आता १९१० रुपयांवर पोहोचला. ५ वर्षांपूर्वी या शेअरची किंमत ६३.७० रुपये इतकी होती.

मीडिया रिपोर्टनुसार, पाच वर्षांत या स्टॉकने २८०० टक्क्यांनी अधिक मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. मागील वर्षांत या शेअरसाठी १ लाखांची गुंतवणुकीचं रुपांतर अडीच लाखात झालं आहे. तर सहा महिन्यात १.८६ लाख रुपये झालं आहे. या वर्षी स्टॉकने १३६ टक्क्यांनी बंपर रिटर्न दिले आहेत. मागील ५ दिवसांत या शेअरमध्ये १५ टक्क्यांनी उसळी घेतली.

share market today
Ratan Tata Business : हेल्थ, टेक ते स्टील... टाटांनी कोणकोणत्या क्षेत्रात झेप घेतली!

भारतात होणार ड्रोनचं हब

भारतात २०३० साली ड्रोनच्या जगतातील हब होणार आहे. देशात सध्या ड्रोनशी संबंधित २०० हून अधिक स्टार्टअप सुरु आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, भारतीय सैन्याजवळ २५०० हून अधिक ड्रोन आहेत. आगामी काळात सैन्याकडे ५००० हून अधिक ड्रोन असणार आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी ड्रोनची संख्या वाढवण्यावर भर असणार आहे.

share market today
Business Ideas: महिलांना घरबसल्या करता येणारे '८' व्यवसाय; होईल बम्पर कमाई

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा संबंधित समितीने अमेरिकेच्या प्रीडेटर ड्रोन ३१ एमक्यू-९बी खरेदी करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. ३१ ड्रोन खरेदी करण्यासाठी अमेरिकेसोबत ३.१ अब्ज डॉलरचा करार झाला आहे. अमेरिकेची सुरक्षा कंपनी जनरल अटॉमिक्स तयार केला आहे.

स्वदेशी आत्मघाती ड्रोन नागास्त्रत्त-१ मुळे सैन्य दलाला नवी ताकद मिळाली आहे. हा ड्रोन लाँच पॅड, शत्रूंचे ठिकाण, ट्रेनिंग कॅम्पसहित घुसखोरांचं हल्ला करू शकतो. हा ड्रोन पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्याची विचार करण्यात येत आहे.

एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोन अमेरिकेसहित कित्येक देशांच्या सैन्य दलाची ताकद आहे. ड्रोन हे नासा, ब्रिटेनचा रॉयल एअरफोर्स, इटलीची वायुसेना, फ्रान्स आणि स्पेनच्या वायूसेनेकडेही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com