

गुरुग्राम, भारत, 20 नोव्हेंबर 2025 : भारतातील सर्वात मोठा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंग लवकरच भारतात गॅलेक्सी टॅब A11+ लॉन्च करण्यास सज्ज आहे. हे टॅबलेट अधिक चांगल्या परफॉर्मन्ससह आणि खास गॅलेक्सी एआय क्षमतांसह ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. हे टॅबलेट सेगमेंटमधील लीडिंग एआय फीचर्स गूगल जेमिनी, सर्कल टू सर्च विथ गूगल आणि सॅमसंग नोट्सवरील सॉल्व्ह मॅथ यांसह पदार्पण करणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना स्मार्ट लर्निंग, चांगली प्रोडक्टिव्हिटी आणि माहितीपर्यंत सोपी पोहोच मिळणार आहे.
गॅलेक्सी टॅब A11+ हा 4nm-आधारित मीडियाटेक MT8775 प्रोसेसरद्वारे चालतो, जो दैनंदिन कामांसाठी स्मूथ आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हे दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल 6GB + 128GB आणि 8GB + 256GB.
यात 2TB पर्यंत एक्स्पांडेबल स्टोरेजचा सपोर्ट आहे, ज्यामुळे वापरकर्ते अतिरिक्त कंटेंट आणि लर्निंग मटेरिअल सहज साठवू शकतात. सॅमसंगला अपेक्षा आहे की गॅलेक्सी टॅब A11+च्या लॉन्चमुळे भारतातील टॅबलेट मार्केटमध्ये त्याचे नेतृत्व आणखी मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी आणि प्रोडक्टिव्हिटी यूजर्ससाठी उपयुक्त डिव्हाइस म्हणून सादर केले जात आहे.
गूगल जेमिनीसह वापरकर्त्यांना रिअल-टाइम व्हिज्युअल एआय मिळते, ज्याद्वारे ते संवादाच्या स्वरूपात इंटरॅक्ट करू शकतात आणि दैनंदिन कामे सोपी होतात. सर्कल टू सर्च विथ गूगल हे एक नवे फीचर आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते अॅप्स बदलण्याची गरज नसताना फक्त एका साध्या जेश्चरने काहीही सर्च करू शकतात. सॅमसंग नोट्समधील सॉल्व्ह मॅथ फीचर जटिल गणिती समीकरणांचे जलद आणि अचूक निराकरण प्रदान करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.