OpenAI मध्ये पुन्हा मोठा बदल; सॅम ऑल्टमॅन पुन्हा येणार; पडद्यामागं काय घडलं?

Sam Altman: सॅम ऑल्टमॅन पुन्हा OpenAI मध्ये परतणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.
Sam Altman Return In Open AI
Sam Altman Return In Open AISaam Tv
Published On

Sam Altman Return In Open AI :

गेल्या काही दिवसात Open Ai ची खूप चर्चा आहे. ओपन एआय कंपनीत सीईओ असलेल्या सॅम ऑल्टमन यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर टेक विश्वात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ओपन एआय कंपनीचे अध्यक्ष ग्रग ब्रॉकमन यांनीही राजीनामा दिला. मात्र, आता पुन्हा सॅम ऑल्टमन यांना कंपनीत पुन्हा बोलवण्यात आले आहे.

सॅम ऑल्टमॅन पुन्हा OpenAI मध्ये परतणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे. सॅम ऑल्टमन यांना सीईओ पदावरुन काढल्यानंतर कंपनीतील अनेक कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यानंतर आता पुन्हा सॅम ऑल्टमॅन परत आले आहेत.

कंपनीने सॅम ऑल्टमॅन पुन्हा कंपनीत दाखल झाले असल्याची माहिती एक्स प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. 'सॅम सॉल्टमॅन सीईओ पदावर पुन्हा येत आहेत. याशिवाय ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी समर्स आणि अॅडम डीअँजेलो यांची नवीन टीम तयार केली जात आहे'. अशी पोस्ट कंपनीने केली आहे.

सॅम ऑल्टमन यांच्या हकालपट्टीनंतर त्यांची मायक्रोसॉफ्ट या कंपनीत एन्ट्री झाली होती. त्यानंतर सॅम ऑल्टमॅन पुन्हा ओपन एआयमध्ये दाखल झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Sam Altman Return In Open AI
Tata Technogies IPO : टाटाची जादू! 20 वर्षानंतर उघडलेल्या IPO ला गुंतवणूकदाराचा प्रचंड प्रतिसाद

'OpenAI बोर्डातील बदलांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रगती करण्यासाठी त्यांनी हे पहिले पाऊल उचलले आहे. सॅम, ग्रेग, आणि मी यासंदर्भात बोललो आणि सहमत झालो आहोत की, Open AI नेतृत्वाच्या संघासोबत OAI ची भरभराट होत राहण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहोत. आम्ही आमची पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना आणि पार्टनर्सला AI चे महत्त्व पटवून देण्यासाठी उत्सुक आहोत'. असं सत्या नडेला यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टनंर सॅम ऑल्टमन यांनी सत्य नडेला यांच्या सपोर्टसाठी आभार मानले आहेत. त्यांनी या पोस्टला रिप्लाय दिला आहे. ' आय लव ओपन एआय. मी गेल्या काही दिवसांत जे काही केले आहे ते सर्व या ग्रुपला आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी केले आहे. जेव्हा मी Microsoft मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे स्पष्ट होते की माझ्यासाठी आणि ग्रुपसाठी हा सर्वोत्तम मार्ग होता. नवीन बोर्ड आणि डब्ल्यू सत्याच्या पाठिंब्याने, मी ओपनईमध्ये परत येण्यासाठी आणि Microsoft सोबत आमची मजबूत पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे'. असं त्यांनी म्हटलं आहे.

Sam Altman Return In Open AI
Gold Silver Rate (22nd November): सोनं ६२ हजार पार, चांदीचा भाव घसरला; लग्नसराईत सोन्याचा दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com