Sanjay Raut: नील सोमय्यांना पार्टनरशिप मिळताच सोमय्या गप्प बसले - राऊत

'भाजप सरकार कोणाला कंत्राट द्यायचे हे लवकरच सांगेल. आमच्यावर धाडी टाकत अटक केली जाईल, करा आम्हाला अटक'
Sanjay Raut/kirit Somaiya
Sanjay Raut/kirit SomaiyaSaam TV
Published On

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आजच्या पत्रकार परिषदेत भाजपसह ईडीच्या अधिकाऱ्यांवरती अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणांना या देशात फक्त शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसलाच प्रश्न का विचारले जातात. ते भाजपच्या नेत्यांना का विचारला जात नाही. सुमित कुमार नरवल सामान्य व्यक्ती होता त्याचा मलबार हिलमध्ये घर,मालमत्ता आहे. ईडी त्यांच्यावर कारवाई का करत नाही. त्यांची संपत्ती 2 ते 3 वर्षात 8 हजार कोटी कशी झाली असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

भाजपच्या (BJP) कोणत्या नेत्यांची संपत्ती त्याच्या जवळ आहे, भाजप सरकार कोणाला कंत्राट द्यायचे हे लवकरच सांगेल. आमच्यावर धाडी टाकत अटक केली जाईल, करा आम्हाला अटक असं आव्हान देत. ईडीचा अधिकाऱ्य़ाने उत्तर प्रदेश मधील 50 उमेदवारांचा खर्च केला असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.

Sanjay Raut/kirit Somaiya
Anil Parab: अनिल परब यांच्या CA च्या घरी आयकर विभागाची छापेमारी

जितेंद्र नवलानी(Jitendra Navlalani) यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानी च्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आलेतया पैश्यांमध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय मंडळीही आहेत. मी आता केवळ 10% गोष्टी सांगितल्या, आज दुपारी नवलानी, ईडी बाबत मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. जितेंद्र नवलानी सह 4 ईडी अधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ईडीचे अधिकारी जेल मध्ये जातील. खंडणी चे पैसे हे विदेशात जात आहेत. याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं सांगतच

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे राकेश वाधवाण यांच्या सोबत काय संबंध आहेत. वसई येथील जमीन खरेदीत काय संबंध आहे. 2012 ते 2016 पर्यंत किरीट सोमय्या यांनी HDIL आणि GVK जमीन घोटाळ्या बाबत MMRDA कडे तक्रार करत होते. नील सोमय्या यांना पार्टनरशिप मिळाल्यानंतर सोमय्या गप्प बसले. PMC घोटाळ्यात राकेश वाधवाण (Rakesh Wadhwan) याला ब्लॅकलिस्टड केल्या नंतर निल सोमय्या यांनी त्यांच्या सोबत बिझनेस पार्टर झाले असंही राऊतांनी परिषदेत सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com