Tata Technogies IPO
Tata Technogies IPOSaam Tv

Tata Technogies IPO : टाटाची जादू! 20 वर्षानंतर उघडलेल्या IPO ला गुंतवणूकदाराचा प्रचंड प्रतिसाद

Tata Technologies : 20 वर्षानंतर आयपीओ बाजारात दाखल झालेल्या टाटा समूहाच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

Tata Technologies IPO Update :

टाटा टेक IPO साठी किंमत बँड 475-500 रुपये प्रति इक्विटी शेअर आहे. IPO अंतर्गत लॉट साइज 30 शेअर्स आहे. गुंतवणूकदारांना अपर प्राइस बँड खात्यातून एका लॉटमध्ये किमान 15,000 रुपये गुंतवावे (Investment) लागतील.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जवळपास 20 वर्षानंतर आयपीओ बाजारात दाखल झालेल्या टाटा समूहाच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies)चा इश्यू सकाळी 10 वाजता सुरु करण्यात आला.

अवघ्या तासाभरात पूर्ण भरला. टाटा टेकने या IPO अंतर्गत 60,850,278 समभागांसाठी बोली मागवली होती. सकाळी 10.48 पर्यंत, उघडण्याच्या एक तासापूर्वी, 6,04,26,120 समभागांसाठी बोली प्राप्त झाली होती.

Tata Technogies IPO
Girl Child Investment Plans: मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत दररोज करा फक्त 166 रुपयांची गुंतवणूक, मिळणार 33 लाख

पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QII) आरक्षित श्रेणी 1.98 पट सदस्यता घेतली होती. संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीसाठी राखीव असलेल्या 1,05,47,382 समभागांच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी 2,08,51,470 समभागांची खरेदी केली होती. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार कोटा (NII) 1.45 पट सदस्यता घेण्यात आला. तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा पहिल्या 60 मिनिटांत 1.02 वेळा सबस्क्राइब झाला.

देशातील सर्वात जुनी कंपनी असलेल्या टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची गुंतवणूकदार दीर्घकाळ वाट पाहत होते. ते उघडताच गुंतवणूकदारांकडून मिळालेला प्रतिसाद अप्रतिम होता.

Tata Technogies IPO
Children's Day Investment Plan: बालदिनानिमित्त चिमुकल्यांसाठी अशी करा गुंतवणूक, भविष्यात पैशांची चिंता भासणारच नाही!

एकंदरीत, 20 वर्षांनंतर टाटा समूहाने आयपीओ बाजारात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गुंतवणूकदार या Tata Technologies IPO मध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत 3,042.51 कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह पैसे गुंतवू शकतात.

DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com