Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

Rule Change From 1st October: १ ऑक्टोबरपासून पैशासंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसपासून ते पेन्शनच्या नियमांचा समावेश आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

१ ऑक्टोबरपासून हे नियम बदलणार

एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार

यूपीआय, पेन्शनच्या नियमातही होणार बदल

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. ऑक्टोबर महिना लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबरमध्ये अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात बदलणाऱ्या नियमांमुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. एलपीजी गॅस ते पेन्शनच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे थेट महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार आहे.

Rule Change
Government Scheme: या सरकारी योजनेत १५०० ऐवजी मिळणार २५०० रुपये; निधी वाढवला; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

एलपीजी गॅसच्या किंमती (LPG Gas Rate)

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत बदलतात. गेल्या अनेक महिन्यांपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाले आहेत. घरगुती गॅसच्या किंमती अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे आता या महिन्यात गॅसच्या किंमती बदलणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

ऑनलाइन तिकीटचे नियम (Online Ticket Rule)

ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता आरक्षण करण्यासाठी वेबसाइट सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त असे प्रवासी आरक्षण करु शकतात, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.

Rule Change
Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना दर महिन्याला मिळणार २१०० रुपये; आजपासून नवीन पोर्टल सुरु

पेन्शनच्या नियमांत बदल (Pension Rule)

आता एनपीएस, यूपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाइटच्या नियमात बदल करण्यात आला आहे. पेन्शन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने सेंट्रल रेकॉर्डकिपिंग एजन्सीकडून मिळणाऱ्या फीमध्ये बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना PRAN उघडण्यासाठी E-PRAN किट १८ रुपये द्यावे लागणार आहे. तर फिजिकल PRAN कार्डसाठी ४० रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.

यूपीआयच्या नियमांत बदल (UPI Rule Change)

आता ऑक्टोबर महिन्यात यूपीआयच्यादेखील नियमांत बदल केले जाणार आहेत. आता NPCI नवीन यूपीआय फीचर्समध्ये पीयर टू पीयर ट्रान्झॅक्शन बंद करण्याची शक्यता आहे. दरम्यान, फ्रॉड रोखण्यासाठी हा नवीन नियम लागू केला जाणार आहे.

बँकांना सुट्ट्या (Bank Holidays)

ऑक्टोबर महिन्यात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. बँकांना २१ दिवस सुट्ट्या असणार आहे. यात दसरा, महात्मा गांधी जयंती आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

Rule Change
EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com