NPS, UPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नियमांत मोठा बदल, १ ऑक्टोबरपासून लागू होणार

NPS, UPS And Atal Pension Yojana Rule Change: एनपीएस, यूपीएस आणि अटल पेन्शन योजनेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.
Rule
RuleSaam Tv
Published On

केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनंतर नेहमी पेन्शन मिळावी, यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नॅशनल पेन्शन सिस्टीम, यूनिफाइड पेन्शन स्कीम आणि अटल पेन्शन योजनेच्या नियमात मोठा बदल करण्यात येणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटीने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीतर्फे वसूल केल्या जाणाऱ्या फीमध्ये बदल केला आहे. आता नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

Rule
Post Office Scheme : पोस्टाच्या PPF योजनेत वर्षाला गुंतवा फक्त ५०,००० रुपये अन् मिळवा भरपूर परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदल

सरकारी कर्मचारी एनपीएस आणि यूपीएस योजनेचा लाभ घेतात. यामध्ये नवीन PRAN उघडण्यासाठी ई-PRAN किटसाठी १८ रुपये आणि फिजिकल PRAN कार्डसाठी ४० रुपये द्यावे लागणार आहे. यासाठी वार्षिक मेंटेनेंस फी १०० रुपये असणार आहे. ज्या खात्यात शून्य बॅलेंस असेल त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अटल पेन्शन योजना आणि NPS-लाइटच्या नियमात बदल

अटल पेन्शन आणि NPS-लाइट योजनेत PRAN उघडण्यासाठी तुम्हाला १५ रुपये भरावे लागणार आहे. वर्षाला मेटेंनेंससाठी १५ रुपये भरावे लागणार आहे.

Rule
Atal Pension Yojana: महिन्याला फक्त ४२ रुपये गुंतवा अन् ५००० रुपयांची पेन्शन मिळवा; या योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

वार्षिक मेटेंनेंससाठी चार्ज

आता तुम्हाला या योजनेत गुंतवणूकीवर वार्षिक मेंटेनेंससाठी चार्ज भरावा लागणार आहे.

शून्य बॅलेंस खात्यावर कोणताही चार्ज नाही

१ ते २ लाख रुपयांच्या कॉर्पसवर १०० रुपये

१ लाख ते १० लाखांवर १५० रुपये चार्ज भरावा लागणार

१० लाख ते २५ लाख रुपयांवर ३०० रुपये भरावे लागणार

१५ लाख ते ५० लाख रुपयांवर ४०० रुपये चार्ज भरावा लागणार

५० लाख रुपयांवर ५०० रुपये फी भरावी लागणार

Rule
Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com