Retirement Planning Goals : दिवसाला फक्त १७ रुपये गुंतवा; वृद्धापकाळात पैशांसाठी हात पसरावे लागणारच नाही

Financial Planning At Age 30 : वयाची ३० ओलांडल्यानंतर तुमच्यावर घराची आणि कुटुंबाची जबाबदारी येते अशावेळी आपल्याला पैशांची सतत चणचण भासते
Retirement Planning Goals
Retirement Planning Goals Saam Tv
Published On

Investment After 30 Ages :

वयाची ३० ओलांडल्यानंतर तुमच्यावर घराची आणि कुटुंबाची जबाबदारी येते अशावेळी आपल्याला पैशांची सतत चणचण भासते. पैसे कितीही साठवण्याचा किंवा जमावण्याचा प्रयत्न केला तरीही आपली बचत होत नाही.

जर तुम्ही वयाची ३० ओलांडली असेल आणि अद्याप गुंतवणूक केली नसेल तर घाबरु नका. सरकार आपल्या अशी काही योजना देत आहे. ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. महिन्याला मिळणाऱ्या पगारातून आपण योग्य प्रकारे गुंतवणूकीचा करु शकतो. यासाठी नॅशनल पेन्शन प्लॅन (NPS) हा बचतीसाठी चांगला पर्याय असू शकतो. निवृत्तीनंतर आपल्या पेन्शनची चिंता करण्याची गरज भासणार नाही.

Retirement Planning Goals
Handicapped Person Governments Scheme: दिव्यांगांसाठी सरकार देतेय या 5 बेस्ट योजना! कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर

1. NPS म्हणजे काय?

NPS ही कर बचत सेवानिवृत्ती योजना आहे. NPS ची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की लोक सेवानिवृत्तीपर्यंत बचत (Saving) करू शकतात आणि त्यातून योग्य तो परतावा मिळवू शकता.

या योजनेत दरवर्षी ६००० रुपये गुंतवणूक (Investment) करु शकतो, ही गुंतवणूक निवृत्तीपर्यंत चालू ठेवावी लागते. निवृत्तीच्या वेळी ६० टक्के रक्कम काढता येते. उर्वरित ४० टक्के रक्कम वार्षिकीमध्ये पुन्हा गुंतवता येते. ज्यामुळे पेन्शन (Pension) देता येईल.

Retirement Planning Goals
Vastu Tips For Bedroom : झोपताना चुकूनही उशीखाली ठेवू नका या ५ गोष्टी, सतत भासेल पैशांची चणचण

2. NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत

पहिला - टियर 1 आणि दुसरा - टियर 2. एनपीएसचे टियर 1 खाते 60 वर्षापूर्वी काढता येत नाही, तर टियर 2 खात्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे जमा आणि काढू शकता.

3. NPS चे फायदे

  • निवृत्ती नियोजनासाठी चांगला पर्याय

  • वार्षिक 6000 रुपयांच्या मर्यादेमुळे गुंतवणूक करता येते.

  • गुंतवणूक 60 वर्षांसाठी लॉक केलेली असल्याने, निवृत्तीसाठी चांगली रक्कम जमा होते.

  • त्यामुळे कराचा बोजा कमी होण्यासही मदत होते. NPS मध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपये आणि कलम 80CCE अंतर्गत 50 हजार रुपयांची सूट मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com