Handicapped Person Governments Scheme: दिव्यांगांसाठी सरकार देतेय या 5 बेस्ट योजना! कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर

Disable Person 5 Governments Scheme : सरकारने दिव्यांगांना ५ नवीन सरकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
Handicapped Person Governments Scheme
Handicapped Person Governments SchemeSaam Tv

Governments Scheme For Handicapped :

सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या गुंतवणूकीच्या सुविधा आणत असते. अशातच राज्य शासनाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींना अधिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवत असते. अशातच सरकारने दिव्यांगांना ५ नवीन सरकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

दिव्यांगांसाठी सरकारने पाच प्रमुख योजना कार्यरत आहे. यामध्ये दिव्यांग पेन्शन, कृत्रिम अवयव/सहाय्यक यंत्र योजना, दुकान बांधकाम/ऑपरेशन लोन योजना, विवाह-प्रोत्साहन योजना, अपंगत्व निवारणासाठी शस्त्रक्रियेसाठी पैसे यांसारख्या योजना राबविण्यात आल्या आहेत. याबाबतीतचा अर्ज कसा करायचा जाणून घेऊया सविस्तर

Handicapped Person Governments Scheme
Gold Silver Rate (4th September) : सोन्याला पुन्हा झळाळी, चांदी जैसे थे; दागिने बनवण्यासाठी मोजावे लागतील इतके पैस, पाहा लेटस्ट रेट

या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागात अर्ज (Apply) करु शकतात. राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन (Online) अर्ज देखील करता येऊ शकतो. तसेच याशिवाय अपंग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयात जाऊनही हा अर्ज करता येतो.

वयोमर्यादेची अट आणि पैसे किती मिळतील?

1. दिव्यांग निवृत्ती वेतन योजना:

दिव्यांग पेन्शन अनुदान योजनेअंतर्गत, किमान 40 टक्के अपंगत्व आलेल्या 18 वर्षांवरील लोकांच्या देखभालीसाठी 500 रुपये आणि त्या स्थितीमुळे ग्रस्त असलेल्या अपंगांसाठी प्रति व्यक्ती 2500 रुपये महिना दिला जातो.

Handicapped Person Governments Scheme
Vastu Tips For Bedroom : झोपताना चुकूनही उशीखाली ठेवू नका या ५ गोष्टी, सतत भासेल पैशांची चणचण

2. कृत्रिम अवयव/अॅक्सेसरीज योजना:

ज्या व्यक्तींना कृत्रिम हातपाय/ उपकरणे योजनेंतर्गत किमान 40 टक्के अपंगत्वाने बाधित असलेल्या दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीला ट्रायसायकल, क्रॅचेस, व्हीलचेअर, श्रवणयंत्र यांसारखे कृत्रिम उपयोगी उपकरणे. वॉकर, कॅलिपर , कृत्रिम अवयव इत्यादी मोफत दिले जातात.

3. तसेच दिव्यांगांना दुकान बांधकाम करण्यासाठी लोन योजना, विवाह-प्रोत्साहन योजना आणि अपंगत्व आल्यास शस्त्रक्रियेसाठी देखील सरकार पैसे (Money) देते. मागच्या पाच वर्षात किमान ५ हजार व्यक्तींना लाभ मिळाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com