Realmeने स्मार्टफोन केला अजून 'स्मार्ट'; बाजारात लवकरच आणणार दमदार फिचर्सवाला नवा फोन

Realme Narzo 70 Pro 5G : Realme कंपनीने एक दमदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोन 67Wफास्ट चार्जिंगसह जबरदस्त फीचर्स देण्यात येणार आहेत.
Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G
Published On

Realme Narzo 70 Pro 5G Expected Features :

Realme २०२४ मध्ये एका नंतर एक मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनी या वर्षाच्या तिसऱ्या लॉन्चिंग कार्यक्रम लवकरच जाहीर करणार आहे. कंपनीने याआधीच Realme 12 Pro 5G ची सीरिज लॉन्च केलीय. आता कंपनी भारतात Realme 12 सीरिज लॉन्च करणार असू कंपनी आता Narzo सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.(Latest News)

कंपनी हा फोन Realme Narzo 70 Pro 5Gच्या नावाने बाजारात आणणार आहे. मार्ज १९ रोजी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा फोन लॉन्च केला जाणार आहे. स्मार्टफोनसह वीन डेमो ग्रीन व्हेरिअंट बड्स T300 TWS इअरबड्स ही लॉन्च केल जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा फोन लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या मोबाईलच्या फिचर्सची माहिती दिलीय. Narzo 70 Pro 5G हा मोबाईल 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. Realmeने स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिलाय. ज्या लोकांना फोटोग्राफीची आवड आहे, त्यांच्यासाठी हा मोबाईल सर्वोत्तम पर्याय आहे.

लो लाइटमध्येही फोटो काढण्यासाठी हा फोन बेस्ट आहे. भारतात लॉन्च करण्यात येणाऱ्या फोनमध्ये Sony IMX890 कॅमेरा दिला जाणार आहे. यासह कंपनी या फोनमध्ये काही एअर जेश्चर देणार आहे. या फिचरमुळे या फोनला स्पर्श न करता कॉलला उत्तर देता येणार आहे. स्क्रीनशॉट घेणे यासारखी मूलभूत कामेदेखील हात न लावता करता येतील.

Realme कंपनी या फोनमध्ये “डुओ टच” ग्लास डिझाइन देणार असल्याचा दावा एका जाहिरातीत करण्यात आलाय. हा मोबाईल फक्त २५,००० रुपयांमध्ये खरेदी करता येईल, असा दावा कंपनीने केलाय. अशा काचेच्या डिझाइनचा हा पहिला फोन असेल. Realme 12मालिकेप्रमाणे डिव्हाइसच्या वरच्या भागात कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध असेल, असा दावा कंपनीने केलाय. Realme Narzo 70 Pro 5G मध्ये फ्लॅट डिस्प्ले असेल. या फोनमध्ये ऑप्टीकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह क्काड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. Realme Narzo 70 Pro 5G ची किंमत ही Realme Narzo 60 Pro 5G प्रमाणे असेल. या मोबाईल फोनची किंमत २३,९९९ रुपे होती.

Realme Narzo 70 Pro 5G
Galaxy A35 Galaxy A35 Review: सॅमसंगचे नवे 5Gवाले लॉन्च; दमदार फिचर्स अन् कमी किंमत ऐकून तुम्हीही कराल खरेदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com