
नवीन वर्ष सुरु होणार आहे.नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. नवीन वर्षात रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन वर्षात रेशन कार्डबाबत काही नियम बदलणार आहेत. (Ration Card Rule Change)
भारत सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टअंतर्गत रेशन कमी किमतीत मिळणार आहेत. रेशन कार्डवर तुम्हाला कमी किमतीत धान्य मिळणार आहेत. देशातील जवळपास ८० कोटी लोकांकडे रेशन कार्ड आहेत. रेशन कार्डचे नियम नवीन वर्षात बदलणार आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांवर परिणाम होणार आहे. (Ration Card Rule Change From New Year)
या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द
सरकारकडून रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य सांगितले आहे. ज्या नागरिकांनी ई-केवायसी केले नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायचे आहे.
जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. १ जानेवारीपासून तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. त्यामुळे रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आजचा एकच दिवस आहे.
रेशन कार्ड ई-केवायसी झाले नाही तर तुम्हाला ते जवळील रेशन कार्ड दुकानावर जाऊन करावे लागेल. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानावर जाऊन आधार कार्ड द्यावे लागेल. त्यानंतर पोओएस मशीनवर फिंगरप्रिंट टाकावे लागेल. त्यानंतर मोबाईलच्या मदतीने ई-केवायसी करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.