

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेल्या नागरिकांच्या कार्डबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबरपासून देशातल्या तब्बल १.५८ कोटी ‘निष्क्रिय’ रेशन कार्ड तात्पुरतं बंद केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमचं रेशन कार्डही या यादीत आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
मात्र, कार्ड थेट रद्द केलं जाणार नाही. सुरुवातीला ते तात्पुरते निष्क्रिय केलं जाईल. संबंधित लाभार्थ्यांना आपलं रेशन कार्ड आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत e-KYC पूर्ण केल्याने कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
सरकारच्या मते, PDS डेटाबेसमध्ये असलेली डुप्लिकेट कार्ड, मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित किंवा अपात्र लाभार्थी यांची छाननी करण्यासाठी ही प्रोसेस केली जात आहे. यामुळे पात्र नागरिकांपर्यंत रेशनचा लाभ व्यवस्थित पोहोचण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
याआधीही आधार सीडिंग, डिजिटायझेशन आणि e-KYCच्या माध्यमातून रेशन कार्डाची पडताळणी करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये सुमारे ५.८ कोटी रेशन कार्ड PDS प्रणालीतून हटवण्यात आल्याची माहिती अन्न मंत्रालयाने दिली होती.
दरम्यान, या प्रोसेसवर काही तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक राजेंद्रन नारायणन यांनी, लाभार्थ्यांना आधी निष्क्रिय करण्याऐवजी त्यांनी रेशन का घेतलं नाही, याची स्थानिक पातळीवर चौकशी करण्याची गरज असल्याची म्हटलं आहे.
अन्न विभागाच्या माहितीनुसार, ३० जुलैपर्यंत ९०.६४ टक्के रेशन लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले होते. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी आपले e-KYC पूर्ण आहे का, याची खात्री करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.