EPFO New Rules: 25 हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर PF अनिवार्य; कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

PF Update : EPFO ने अनिवार्य पीएफ कव्हरेजची वेतनमर्यादा १५ हजारांवरून २५,००० रुपये केली आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना EPF चा लाभ मिळू शकतो.
EPFO New Rules
EPFO New RulesSaam Tv
Published On: 

तुम्ही तुमच्या पगारातला काही भाग पीएफमध्ये जमा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने EPFO अंतर्गत अनिवार्य कव्हरेजसाठीची वेतनमर्यादा १५,००० ते २५,००० रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना आता EPFOच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा लाभ मिळणार आहे.

५१ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा

सरकारच्या अंदाजानुसार या निर्णयामुळे देशभरातल्या ५१ लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त कर्मचारी पहिल्यांदाच अनिवार्य EPFO कव्हरेजच्या कक्षेत येऊ शकतात. यामुळे या कर्मचाऱ्यांना EPF बचत, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि EDLI अंतर्गत विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

EPFO New Rules
Horoscope October : ऑक्टोबरमध्ये ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मिळू शकतो लाभ

२५ हजारांच्या पगारावर काय बदलणार?

EPFO मध्ये याआधी १५ हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना EPF कव्हरेज आपोआप लागू होत नव्हते. आता १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या वेतन श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांना अनिवार्य कव्हरेज मिळणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून PF योगदान सुरू होऊ शकते.

याचा परिणाम त्यांच्या टेक-होम सॅलरीवर होऊ शकतो, कारण PFसाठी योगदान वजा होईल. मात्र, त्याचवेळी रिटायरमेंटसाठी बचत, पेन्शन आणि विमा संरक्षण अशा सामाजिक सुरक्षेचे फायदे मिळतील.

EPFO New Rules
E Challan: वीज बिलातून ई-चालान वसूल होणार? सुप्रीम कोर्टाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

पेन्शनमध्येही बदल

नवीन वेतनमर्यादेच्यामुळे EPS अंतर्गत पेन्शनसाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या कमाल वेतनमर्यादेतही वाढ झाली आहे. EPFOच्या माहितीनुसार, नियोक्त्याच्या EPS योगदानाचा कमाल हिस्सा ८.३३ टक्क्यांनुसार १,२५० रुपयांवरून सुमारे २,०८३ रुपये प्रतिमहिना होऊ शकतो.

दरम्यान, सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे जास्त कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराच्या रचनेत PF कपात आणि नियोक्त्याच्या योगदानाचा परिणाम तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com