LIC Jeevan Dhara ll: राम मंदिर लोकार्पणदिनी LIC ची नवीन पॉॉलिसी; गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

LIC Jeevan Dhara ll: आज राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनीने नवीन पॉलिसी लाँच केली आहे. LIC ने राम मंदिर उद्घाटनानिमित्त जीवन धारा II ची नवीन पॉलिसी लाँच केली आहे.
LIC
LIC Saam TV
Published On

LIC New Policy Jeevan Dhara ll:

आज राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिराच्या उद्घानानिमित्त देशात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. याच दिवशी देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनीने नवीन पॉलिसी लाँच केली आहे. LIC ने राम मंदिर उद्घाटनानिमित्त जीवन धारा II ची नवीन पॉलिसी लाँच केली आहे. (Latest News)

काय आहे ही पॉलिसी?

LIC ची ही नवीन जीवन धारा II पॉलिसी नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसेपेटिंग अॅन्युटी प्लान (Annuity Plan)आहे. ही एक वैयक्तिक बचत आणि वार्षिक योजना आहे. या पॉलिसीमध्ये अॅन्युटीची सुरुवातीपासून गॅरंटी देण्यात येणार आहे. याअंतर्गत पॉलिसीधारकांना ११ अॅन्युटी पर्याय उपलब्ध असतील. तसेच पॉलिसीधारकांना जास्त वार्षिक दर आणि जीवन संरक्षण मिळेल.

वयोमर्यादा

जीवन धारा II पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वय किमान २० असावे. पॉलिसीमध्ये निवडलेल्या अॅन्युटी पर्यायांवर अवलंबून वय ८०/७०/६५ या वर्षांवर मायनस डिफरमेंट कालावधी असू शकतो. पॉलिसीधारकांना ११ अॅन्युटी पर्याय उपलब्ध आहेत.

LIC
Business Idea: २० ते ३० किलो रुपयांच्या टोमॅटोमधून कमवा लाखो रुपये; घरी सुरू करा टोमॅटो केचपचा व्यवसाय

जीवन धारा IIअॅन्युटी ऑप्शन

रेग्युलर प्रीमियम- डेफरमेंट कालावधी ५ वर्ष ते १५ वर्ष असेल. सिंगल प्रीमियम- डेफरमेंट कालावधी १ वर्ष ते १५ वर्ष आहे. या पॉलिसीत तुम्ही सिंगल लाइफ अॅन्युटी किंवा जॉइंट लाइफ अन्युटी असे पर्याय आहेत.

ही नवीन पॉलिसी २२ जानेवारी २०२४ पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. यासाठी तुम्ही एलआयसी शाखा किवा विमा एजंटशी संवाद साधू शकता.

LIC
Laptop अन् Phone ही मिळणार भाड्याने, वाचा काय आहे Jio ची ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com