Railway Rule: रेल्वेत मिळणारे बेडशीट आणि उश्या घरी नेताय; तर होऊ शकतो तुरुंगवास; काय सांगतो नियम?

Railway Rules: रेल्वेने प्रवास करताना स्लीपर कोच किंवा एसी कोचमध्ये तुम्हाला बेडशीट उश्या दिल्या जातात. अनेकजण हे सामान घरी घेऊन जातात. हे सामान घरी घेऊन गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
Railway Rule
Railway RuleSaam Tv
Published On

अनेकजण लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करतात. अनेकजण गावी जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. काहीजण १२-१२ तास ट्रेनने प्रवास करतात. दरम्यान, आता ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

Railway Rule
Indian Railway : धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटला टॉयलेट वापरण्याची गरज पडल्यास कुठे जातो? जाणून घ्या सविस्तर

रेल्वेचे नियम

जर तुम्ही रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. रेल्वेचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बेडशीट, उशी, ब्लँकेट दिले जाते. हे बेडशीट, उशी फक्त रेल्वे प्रवासात वापरण्यासाठीच असते.

अनेकजण या गोष्टी घरी घेऊन जातात. रेल्वेच्या मालकीच्या या सामानांची चोरी करतात. असा चोरीचा प्रकार समोर आल्यास दोषींवर रेल्वेकडून कडक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दोषी व्यक्तीस तुरुंगवास होऊ शकतो.

रेल्वेचा नियम काय? (Railway Rule)

रेल्वे कायदा १९६६ च्या कलम ३ अंतर्गत, 'कोणत्याही रेल्वे मालमत्तेची चोरी, नुकसान किंवा गैरवापर हा गंभीर गुन्हा मानला जातो. पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्या प्रवाशास एक वर्षापर्यंत तुरुंगवास, १,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. यापुढे वारंवार गुन्हा केल्यास शिक्षा अधिक कठोर होते. यानुसार ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. रेल्वे संरक्षण दल ही बाब गांभीर्याने पाहत आहे.

Railway Rule
Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, १०१० पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

रेल्वेने प्रवास करताना या गोष्टी कधीच नेऊ नये

रेल्वेने प्रवास करताना काही गोष्टी कधीच घ्यायच्या नसतात. यामध्ये ज्वलनशील पदार्थ, स्फोटक वस्तू, अॅसिड, विषारी पदार्थ, शस्त्रे, दारु अशा वस्तू घेऊन जाऊ नये.तसेच परवानगीपेक्षा जास्त समान घेऊन जाणेही चुकीचे आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सुकलेले नारळदेखील घेऊन जाण्यास मनाऊ आहे. कारण हे ज्वलनशील आहे. त्यामुळे रेल्वेच्या या सर्व नियमांचे पालन करा. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला दंड होऊ शकतो.

Railway Rule
Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com