

रेल्वेत नोकरीची संधी
१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी
२८०१ पदांसाठी होणार भरती
रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. साउथ सेंट्रल रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. साउथ सेंट्रल रेल्वेत एकूण २८०१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२६ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.
रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत त्यांनी आयटीआयमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्यांच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड
रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. तुमचे १०वीतील आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये फी भरायची आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला रेल्वेच्या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला भरतीसंबंधित लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर महत्त्वाची माहिती आणि कागदपत्र अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.
फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.