या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मासिक पेन्शनबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Railway Employees UPS Pension Rules 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमचे नियम जाहीर झाले आहेत. UPS अंतर्गत पात्रता, 10 वर्षांची सेवा, सुनिश्चित पेन्शन, कर्मचारी-सरकारचे योगदान, फॅमिली पेन्शन आणि NPSमध्ये जाण्याचे नियम जाणून घ्या.
Railway employees UPS pension rules 2026
Railway employees UPS pension rules 2026saam tv
Published On

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम संदर्भातील नियम जाहीर केले आहेत यामध्ये UPS ची पात्रता, कर्मचारी आणि सरकारचे योगदान, पेन्शनची गणना, कुटुंब निवृत्तीवेतन, स्वेच्छानिवृत्ती (VRS) आणि UPS मधून NPSमध्ये जाण्याच्या नियमांबबत स्पष्टता करण्यात आली आहे.

Railway employees UPS pension rules 2026
EPS Pension Hike: वेज सीलिंग वाढल्यास मिळणार ₹12,500 पेन्शन? वाचा संपूर्ण गणित

UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना काय मिळणार?

युनिफाइड पेन्शन स्कीमअंतर्गत येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 10 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर किमान 10 हजार रुपये मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. तर 25 वर्षांची पात्र सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण सुनिश्चित पेन्शन मिळू शकते. तसेच 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून NPS अंतर्गत UPS योजना लागू केली होती. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने UPS लागू केली जात असून, आता भारतीय रेल्वेनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केली आहे.

Railway employees UPS pension rules 2026
EPFO New Rule: ईपीएफओचा नियम बदलला! ₹२५,००० पगार असलेल्यांना किती मिळणार पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण गणित

UPS अंतर्गत कोणते रेल्वे कर्मचारी येणार?

1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले आणि NPSच्या कक्षेत असलेले रेल्वे कर्मचारी UPSसाठी पात्र असतील. मात्र, कॅज्युअल किंवा रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि इतर निवृत्तीवेतन नियमांच्या कक्षेत येणाऱ्या काही विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांना UPSचा लाभ मिळणार नाही. UPS अंतर्गत रेल्वे आणि कर्मचारी दोघांचेही योगदान असेल. रेल्वेकडून कर्मचाऱ्याच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या (DA) 10 टक्के रकमेइतके योगदान दिले जाईल.

Railway employees UPS pension rules 2026
8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

कर्मचाऱ्यांचे योगदान किती?

UPSमध्ये सहभागी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला दर महिन्याला आपल्या मूळ वेतन आणि DAच्या 10 टक्के रक्कम वैयक्तिक UPS खात्यात जमा करावी लागेल. कर्मचारी प्रोबेशनवर असला किंवा केंद्र अथवा राज्य सरकारच्या विभागात प्रतिनियुक्तीवर असला, तरी त्याचे योगदान सुरू राहील. रेल्वेकडून देण्यात येणारे योगदानही नियमानुसार सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वे कर्मचाऱ्याला सेवाकाळात एकदा UPS मधून NPS मध्ये जाण्याचा पर्याय उपलबद्ध असेल. मात्र, एकदा NPS निवडल्यानंतर पुन्हा UPS मध्ये परतण्याची परवानगी नसेल. UPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पात्र कायदेशीर जोडीदाराला फॅमिली पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या सुनिश्चित पेन्शनच्या 60 टक्के असेल. तसेच UPS अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन आणि फॅमिली पेन्शनवर महागाई राहत (DR) देण्याचीही तरतूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com